आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवंती नगर-विजापूर महामार्ग जोड, पाच किमीचे काम वेगात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात रस्त्याची कामे सुरू आहेत. सम्राट चौक ते कोंतम चौक रस्त्याचे काम वर्क आॅर्डरनुसार होत नसून, रुंदी कमी आहे. या कामाची मुदत आॅगस्ट रोजी संपली असताना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. हे काम संथगतीने सुरू आहे, तर आवंती नगर ते राजस्व नगरपर्यंत ५४ रुंद मीटर रस्ता काम सुरू असून, तुलनेने त्याचे काम जलदगतीने सुरू आहे. सुमारे पाच किमी लांबीचा हा रस्ता आहे.
शिवाजी चौकातील वाहतूक कमी करण्यासाठी अवंती नगर ते राजस्व नगरमार्गे विजापूर महामार्गला जोडणाऱ्या ५४ मीटर रुंद रस्त्याचे काम सुरू अाहे. पाच किलो मीटर रस्ता असून त्यापैकी ४२० मीटरचे काम पूर्ण झाले. २९.९६ कोटी रुपयांचे काम अाहे. १४८० मीटर रस्त्याचे भूसंपादन करणे आवश्यक असून, त्यासाठी महापालिका नगर रचना कार्यालयाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी विरोध केला तर काहीजणांनी मान्यता दिली.
देशमुख वस्तीजवळ काही ठिकाणी अतिक्रमण असल्याने तेथे रस्ता वळवण्यात आला आहे. या ५४ मीटर रुंद रस्त्यावर रेल्वेचे भुयारी रेल्वे मार्ग असून, त्यासाठी केंद्रीय रेल्वे विभागाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रयत्न केले. त्या रस्त्यावर भूसंपादन वगळता अन्य अडथळे दूर झाले. मनपाच्या ताब्यात असलेल्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

नगरअभियंता आणि नगर रचना कार्यालयाकडून चालढकल : कोंतमचौक ते सम्राट चौक रस्त्यावरील भूसंपादन करण्याची जबाबदारी मनपा नगर रचना कार्यालयाची आहे. त्यांना याबाबत पत्र दिल्याची माहिती नगर अभियंता कार्यालयाचे रस्ते विभाग प्रमुख संदीप कारंजे यांनी सांगितले. याबाबत नगर रचना कार्यालयाचे प्रमुख महेश क्षीरसागर यांना विचारले असता, आमच्याकडे भूसंपादनाचा विषय नाही. डीपी रोडप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावे असे त्यांनी सांगितले. दाेन्ही कार्यालयाकडून चालढकल हाेत असल्याचे दिसून येते.

सम्राट चौक ते कांेतम चौक रस्त्याचा वाद
सम्राट चौक ते कांेतम चौकापर्यंत २.८ किमी रस्त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. नियोजनात १८ मीटर रस्ता असताना प्रत्यक्षत १० मीटर रस्ता करण्यात आला. अतिक्रमण काढले नाही. बांधकाम व्याप्त जागा महापालिकेने संपादित केली नाही. नगरसेवक सुरेश पाटील यांच्या तक्रारीनंतरही चौकशी झाली नाही. या रस्त्याचे वर्कआॅर्डर मुदत आॅगस्ट रोजी सपुंष्टात आली. त्यांना मुदतवाढ दिली. तो रस्ता आताच वारंवार खोदला जात आहे. अनेक ठिकाणी तो खचलेला आहे. नुकतीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.

महापालिकेचा होणार फायदा
शहराच्या विस्तारीत भागात ५४ रुंद मीटर रस्ता परिसरातील भाग येत असून, पाच किमी रस्त्यावरील दोन्ही बाजूस सुमारे दीड हजार एकर खुली जागा अाहे. या रस्त्यामुळे त्या जागेवर बांधकाम आणि इतर विकास झाल्यास महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी बांधकाम परवानासह इतर विकास कामासाठी मनपास शुल्क मिळेल.

ताण कमी होणार
विजापूर रस्ता परिसरास जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळाल्याने स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन मार्गावरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. एरवी विजापूर रस्ता परिसरात जाण्यासाठी स्टॅण्ड, स्टेशन वरून सातरस्तापर्यंत जावे लागते. त्याऐवजी वाहने संभाजी चौकातूनच अवंतीनगर मार्गावर वळतील. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल.

भूसंपादनासाठी नगरचना खात्यास पत्र दिले आहे
^सम्राटचौकते कांेतम चौक रस्त्यावरील भूसंपादन करून देण्यासाठी नगररचना कार्यालयास पत्र दिले आहे.” संदीपकारंजे, उपअभियंता, महापालिका

बातम्या आणखी आहेत...