आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-मेलद्वारे आमिष; फसवणुकीचा नवा फंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. मात्र, या वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामाबरोबरच अनेकदा फसवणुकीसाठीही केला जात आहे. विशेषत: शैक्षणिक वा नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींमध्येही दिवसेंदिवस वाढ हाेत अाहे. कोणतीही प्रक्रिया पूर्ण करता अथवा कागदपत्रांची पूर्तता करता थेट नोकरी अथवा मुलाखतीसाठी निवड झाल्याचे फसवे ई-मेल पाठवले जातात. या ई-मेलला तातडीने रिप्लाय पाठवण्याच्या सूचना करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक म्हणून बँक खात्याची, अार्थिक उत्पन्नाची माहिती मागवली जाते. अनेकदा नोकरी उच्च शिक्षणाची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांकडून, बेरोजगारांकडून माहिती सोबत हजारो रुपये संबंधितांकडे पाठवले जातात. मात्र, यात बहुतांश सर्वच प्रकरणात फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे फसवणूक झाली तरी अनेकदा युवकांकडून पोलिसांकडे तक्रार करण्याकडे कानाडोळाच केला जात असल्याने अशी फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास पोलिस प्रशासनाला अडचणी निर्माण होत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. 
 
कर्ज देण्याच्या अामिषाने फसवणूक 
सोलापूर नोकरी लावतो म्हणून अाॅनलाइन फाॅर्म भरण्यास सांगितले. त्यानंतर प्रोसेसिंग फी म्हणून १२५० रुपये बँकेत भरण्यास सांगून फसवणूक केली. लक्ष्मीकांत मळसिद्ध काळे (वय ३०, रा. रोहिणीनगर, विजापूर रोड) यांनी या फसवणुकीविरोधात विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली अाहे. रितू आणि राहुल (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. अाॅगस्ट २०१६ मध्ये ही घटना घडली होती. स्थानिक वृत्तपत्रांतून मुद्रा फायनान्स दिल्ली येथे कर्ज मिळेल, अशी जाहिरात देण्यात अाली होती. त्यानुसार दिलेल्या मोबाइल नंबरवर लक्ष्मीकांत काळे यांनी फोन केला. त्यांना पाच लाख रुपयांचे कर्ज देण्याचे अामिष दाखवण्यात आले. प्रोसेसिंग फी म्हणून पैसे भरण्यास सांगण्यात अाले. स्टेट बँकेत दिलेल्या खात्यावर पैसे भरले. काही दिवसांनी प्रतिसाद मिळाला नाही. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात अाले. सायबर क्राइम सेलमध्ये याबाबत तक्रार देण्यात अाल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक सूर्यकांत पाटील तपास करत अाहेत. 
गुन्हे शाखा सायबर सेल, पोलिस निरीक्षक  सूर्यकांत पाटील 
 
सोशल मीडियातून फसवणूक, सायबर सेलकडे करा तक्रार 
मागील काही महिन्यांमध्ये सोशल मीडियातून फसवणूक, बदनामी करणे असे काही प्रकरण सोलापुरात घडले आहेत. काही प्रकरणे सायबर सेल विभागाने उघडकीस आणली अाहेत. काहीचा तपास सुरू आहे. सोशल माध्यमे अथवा तंत्रज्ञानाचा उपयोग करून कोणी फसवणूक अथवा बदनामी करत असल्यास सायबर सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन सायबर सेल विभागाने केले अाहे. 

फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी तपासा 
{अापण काहीच केले नाही तरी नाेकरी वा परदेशी शिक्षणाबाबत मेल येत असेल तर त्याची अाधी चाैकशी-शहानिशा करावी. 

{ अनेकदा विविध संकेतस्थळांवर विद्यार्थी, युवकांची माहिती जमा करून ती माहिती विविध कंपन्या, शैक्षणिक संस्थांना विकली जाते. याच कारणामुळे अनेकदा असे फसवे मेल पाठवून संबंधितांची माहिती जमा केली जाते. त्यामुळे असे मेल आल्यास संबंधितांच्या सत्यतेबाबत खात्री केली पाहिजे. 

{ मुलाखतीसाठी निवड झाल्यानंतर कंपनी अथवा शैक्षणिक संस्थेद्वारे पैशांची मागणी केली जात नाही. यामुळे असे मेल करून कोणी पैशांची मागणी केल्यास तत्काळ तक्रार करावी. 

{ सोशल नेटवर्किंग साइट‌्स अथवा ई-मेलद्वारे कोणत्याही अनाेळखी व्यक्तीसोंबत अार्थिक व्यवहार करण्याचे टाळले पाहिजे. 

{ नोकरी लागल्याचे, उच्च शिक्षणासाठी विदेशात निवड झाली आहे, शक्यतो अनोळखी मेल्सला उत्तर देऊ नका. 

लिंकवर क्लिक केल्यास हॅक होऊ शकताे मेल-अायडी 
अनेकदा या फसव्या मेलसोबत अधिक माहितीसाठी विविध लिंक पाठवल्या जातात. या लिंकवर क्लिक केल्यास आपला मेल हॅक होऊन आपले संपूर्ण मेल अकाउंंट हॅक होण्याची शक्यता असते. याबरोबरच अनेकदा व्हायरस पसवण्यासाठीही अशा प्रकारच्या लिंक पाठवल्या जात असल्याचे प्रकार समाेर आले आहेत. यामुळे असे फसवे मेल शक्यताे टाळावेत. 
 
सोलापूरच्या काही विद्यार्थ्यांना अालेले ई-मेल आणि झालेली फसवणूक अशी 
नोकरीसाठी तुमची निवड झाली असून, पुढच्या आठवड्यात मुलाखत होणार आहे. परदेशातील शिक्षणासाठी हजारो विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली असून, तातडीने तुमची सर्व माहिती पाठवा असा मेल करून युवकांना ई-मेलद्वारे नोकरीचे अामिष दाखवले जाते. मात्र, ही सर्व माहिती पाठवल्यानंतर प्रक्रियेसाठी पैशांची मागणी केली जात असल्याने अापली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात येते. असे असतानाही तक्रार देण्यासाठी काेणीही पुढे येत नाही. या प्रकारावर डी. बी. स्टारने वेधलेले लक्ष... 
 
मेलद्वारे हाेणाऱ्या फसवणुकीच्या काही तक्रारी अाहेत का? 
आमच्याकडेआॅनलाइन नोकरी, आॅनलाइन कर्ज, एटीएम कोड विचारत परस्पर पैसे काढणे, अशा गुन्ह्यांची नोंद आहे. 

अशातक्रारींबाबत पुढे काय? 
लोकांनाअालेल्या फोन काॅल्सवरून अाम्ही तपास करतो. बँक अकाऊंटची तपासणी केली जाते. 

पोलिसांकडून काय उपाययोजना 
अाॅनलाइनप्रकरणात, नोकरी, कर्ज देतो म्हणून कुणी अामिष दाखवत असल्यास सावधानता बाळगावी. खातरजमा करावी. मगच पैसे अथवा व्यवहार करावेत. हा तपास किचकट असल्यामुळे वेळ लागतो. मुख्य म्हणजे सावधानता बाळगणे हाच यावर चांगला उपाय अाहे. सायबर सेलच्या माध्यमातून या घटनेचा तपास करावा लागतो. 
 
इंटरनेटचा वापर करून फसवे मेल तयार करून अनेकांना फसवले जातात. विशेष म्हणजे फसवणूक होणाऱ्यांमध्ये आयटी सेक्टरशी निगडित असलेले नागरिक, विद्यार्थी यांची सर्वाधिक संख्या असते. फसवे मेल पाठवून अनेकदा माेठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर क्राइमच्याही संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१५ मध्ये देशभरात साधारणत: लाख सायबर क्राइम घटनांची नोंद करण्यात आली अाहे, तर त्यात दृपटीने वाढ होऊन २०१६ मध्ये देशभरात साधारणत: लाख सायबर क्राइमची नोंद करण्यात आली अाहे. सायबर क्राइम राेखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एक हजार पोलिसांची नेमणूक करण्यात आली असून तंत्रज्ञानाशी संबंधित गुन्हे उघडकीस अाणण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते. 
-चिन्मय दीक्षित, सायबरतज्ज्ञ 
 
आपल्या प्रतिक्रिया : तुमची पसंती नावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...