आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंनंतर आता प्रभूंचीही कुल्हडवर ‘कृपा’; सुविधा पुरवण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी देशभरातील सर्व रेल्वेगाड्या व स्थानकावर प्रवाशांना कुल्हडमधून चहा देण्याची साेय उपलब्ध करून दिली हाेती. मात्र, कालांतराने ती बंद पडली. अाता विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुन्हा कुल्हडमधून प्रवाशांना चहा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली अाहे. त्यामुळे सोलापूरसह मध्य रेल्वेच्या अन्य स्थानकांवर कुल्हड उपलब्ध झाले अाहेत.

ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन मिळावे व ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी या हेतूने रेल्वे प्रशासनाने कुल्हडमधून चहा विकण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सोलापूर स्थानकावरील फलाट क्रमांक एकवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कुल्हडची सेवा उपलब्ध करण्यात आली. प्लास्टिक कपांना पर्याय म्हणून मातीपासून बनवलेले कुल्हड वापरले जात अाहेत. मात्र, प्रत्यक्षात अाता त्यावरही शंका उपस्थित केल्या जात अाहेत.
कुल्हड मातीपासून बनवले जाते. त्याचे लगेच विघटन होत नाही. प्रवासी चहा घेऊन तो कुल्हड इतरत्र टाकल्यानंतर त्याचे लगेच विघटन होणार नाही. स्थानकावर किंवा ट्रॅकवर कुल्हडचा खच पडल्यावर त्यामुळे ट्रकवरील नाले बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्लास्टिक कपापेक्षा कुल्हडचे दरही जास्त अाहेत. बहुतांश रेल्वेस्थानकांवरील अधिकृत कॅन्टीनमध्ये पाच रुपयांना चहा मिळताे. मात्र, सोलापुरातील कुल्हडची िकंमतच सहा ते सात रुपये आहे.
त्यामुळे महागड्या कुल्हडमधून चहा विकायचा कसा, हा प्रश्नही खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पडला आहे. त्यामुळे कुल्हडवर प्रभूंची कृपा झाली असली तरीही प्रत्यक्षात कुल्हडमधून चहा विकणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे कुल्हडचा हा प्रयोग किती दिवस टिकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अादेशाचा अंमल
^प्रवाशांना कुल्डमधूनच चहा देण्याचे अादेश रेल्वे बोर्डाने काढले अाहेत. त्यामुळे मध्य रेल्वेतील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर अाता यापुढे कुल्हडमधून प्रवाशांना चहा मिळणार आहे.
के. जयशंकर, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई.