आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठला... जवान, किसानाचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी शासनाला दे! विठ्ठल मंदिरात अनोखे अांदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- राज्यातील जवान किसान प्रचंड दु:खी असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारला सुबुध्दी देण्यासाठी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने चक्क श्री विठ्ठलाला साकडे घालून एक अनोखे आंदोलन आज (ता.२२) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आले. 

सुखी जवान, सुखी किसान तभी बनेगा भारत महान, हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या विदर्भातील श्री गुरुदेव सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शेतकरी दररोज आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवित आहेत, तर राज्यातील सुरक्षा जवानही प्रचंड ताणतणावाखाली आपले जीवन जगत आहेत. कुठे नक्षलवादी हल्ल्यात, तर कुठे आत्महत्या करुन तेही मृत पावत आहेत. शेतकरी आणि जवान या दोघांनाही सुखी करण्याची जबाबदारी ही शासनाची अाहे. शासनाने ती कर्तव्य भावनेतून पार पाडावी. या वेळी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन श्री विठ्ठलाच्या पायावर ठेवले. या वेळी सेनेचे दिलीप भोयर, मिलिंद पाटील, सेवकरामजी, महेश पवार, कवडूजी वडस्कर, गणेश खरवडे, वसंत काटकोजवार, उत्तमपाचभाई, आकाश सुर, रवींद्र बोडे, प्रकाश डाहुले, बालाजी काकडे, प्रकाश पायघन, देवराव पाटील धांडे, राजकुमार किनाके उपस्थित होते. 

संपूर्ण कर्जमाफी द्यावी 
शेतकऱ्यांनासंपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. डॉ.स्वामिनाथ आयोग लागू करून हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी. यवतमाळ जिल्हा तत्काळ दारूमुक्त घोषित करावा. शासकीय कामकाजापूर्वी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना लागू करून कामकाजाची सुरुवात करण्यात यावी, असा कायदा करून त्यांची अंमलबजावणी करावी. वर्ग पाच ते उच्चपदविका शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात ग्राम गीतेचा समावेश करावा. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करावा त्यांची नावे थोर महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावीत. सोलापूर विद्यापीठास जगद््गुरू तुकाराम महाराज यांचे नाव द्यावे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दोन कोटींची मदत द्यावी. तेलगंणाप्रमाणे राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे. पोलिसांच्या कर्तव्याचे आठ तास करण्यात येऊन लोकसंख्येनुसार त्यांची भरती करावी. सैन्य भरती पोलिस भरतीमध्ये पोलिसांच्या मुलांना दहा टक्के आरक्षण द्यावे. गृहरक्षक दलाच्या जवानांना पोलिस खात्यात समाविष्ट करून पोलिसांप्रमाणे सर्वलाभ तसेच सोयीसुविधा द्याव्यात. 
बातम्या आणखी आहेत...