आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Development Of Cities Will Cost 14 Lakh

विद्यापीठ १४ लाख खर्चून गावांचा विकास करणार, दत्तक गावातील महिलांचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; सोलापूर विद्यापीठाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत जिल्ह्यातून निवडक सात गावे दत्तक घेतली. दत्तक घेतलेल्या सात गावांत मूलभूत सुविधा, विकास दर वाढवण्यास विद्यापीठ फंडातून १४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तरतूद एका वर्षासाठी असून प्रत्येक गावाला दोन लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. या निधीद्वारे पायाभूत सुविधा तयार करून गावाचा विकास साधण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सांगितले.

सोलापूर विद्यापीठ, ग्रामीण विकास विभागतर्फे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या सात गावांतील कर्तृत्ववान सात महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, संचालक डॉ. ई. एन. अशोककुमार, प्राचार्य आर. वाय. पाटील, डॉ. जी. एस. कांबळे आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दत्तक सात गावांतील अर्थिक िस्थती, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय विषयीचा अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

शासनाकडून आखलेल्या विविध योजना तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहचवण्यात येत नाहीत. त्याकरता कर्तृत्त्वान महिलांनी पुढाकार घ्यावा. दुर्बल घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना शिक्षण प्रबोधन करण्यात यावे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे. महिलांनी परावलंबी राहता विचारांच्या कक्षा रुंदावून जिद्द , चिकाटी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सक्षम बनले पाहिजे, असे मत अॅड. पल्लवी रेणके यांनी व्यक्त केले. सोलापूर विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या गावातील महिलांचे गावच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान आहे.
गावात येत्या काळात विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे सामाजिक शास्त्र संकुलचे संचालक डॉ. ई. एन. अशोककुमार यांनी सांगितले. तसेच आर. वाय. पाटील यांनी विद्यापीठाविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक स्वागत डॉ .जी. एस. कांबळे यांनी केले. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आर. बी. चिंचोलकर, डॉ. सी. एस. भानुमते, डॉ. प्रकाश व्हनकडे, प्रा. अंबादास भासके, प्रा. सोनली गिरी, प्रा. नष्टे आदी उपस्थित होते.

यांचा करण्यात आला गौरव
सोलापूरिवद्यापीठ, सामाजिक शास्त्र संकुलातील ग्रामीण विकास विभागतर्फे दत्तक सात गावांमधील प्रज्ञा कुलकर्णी, रंजनी बडवे, सखूबाई गडसिंगे, सुनिता धर्मशाळे, रमेजाबी मुल्ला, एस. सय्यद, कस्तुरा चव्हाण या कर्तृत्वान महिलांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी पीएचडी पदवी प्राप्त प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर स्वाती कांबळे, तेजिस्विनी कांबळे, मोनाली नारायणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जबाबदारी वाढली
गौरवकेल्यामुळे कामाची जबाबदारी वाढली असून आणखी काम करावे लागेल. विद्यापीठाने दत्तक घेतलेले गाव रोल मॉडेल बनवणारच. विकास कामाकरता विद्यापीठाला सहकार्य केले जाईल. सुनिताधर्मशाळे
सोलापूर विद्यापीठात ग्रामीण महिला दिनानिमित्त सात महिलांचा सत्कार झाला. यावेळी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, प्रमुख पाहुण्या अॅड. पल्लवी रेणके आदी.