आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ सत्र परीक्षा १८ पासून सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांना १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. शहर जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. या केंद्रांवरून सुमारे ५४ हजार विद्यार्थी सत्र परीक्षा देतील.
विद्यार्थ्यांच्या अभ्यास नियोजनासाठी सत्र परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने दोन महिन्यापूर्वीच घोषित केले होते. त्यानुसार बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी, बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी, आंत्रप्रिनरशीप, एन्टायर काॅम्प्युटर सायन्ससह एम.ए., एम.कॉम. एमएसडब्ल्यू एमसीए सायन्स या अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांना प्रारंभ होत आहे. यंदा सत्र परीक्षा दिवाळीआधी दिवाळीनंतर अशा दोन टप्प्यांत घेण्यात येत असून पहिला टप्पा १८ पासून सुरू होत असल्याचे परीक्षा नियंत्रक डाॅ. बी. पी. पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...