आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Of Inspection Will Be In September From "NAAC 'Committee

‘नॅक’ समितीकडून सप्टेंबरमध्ये होणार विद्यापीठाची तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठच्या मानांकन तपासणीसाठी सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात ‘नॅक’ समिती भेट देणार आहे. दरम्यान विद्यापीठ अंतर्गत परीक्षण समितीने विद्यापीठाच्या सर्व संकुलाची पाहणी केली. मुख्य तपासणी ‘नॅक’ समिती करेल. त्यानंतर विद्यापीठाला नॅक नामांकन मिळेल.

स्थापनेपासून म्हणजे २००४ पासून प्रथमच विद्यापीठ नॅक तपासणीस सामोरे जात आहे. विद्यापीठ जणू परीक्षेस बसत आहे. यात मिळणारी गुणवत्ता ग्रेड जास्तीत जास्त चांगली मिळाली तर विद्यापीठाची प्रतिमा आणखी वाढीस लागेल. नॅकची सहा सदस्यांची समिती सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष भेटीस येत आहे.

विद्यापीठाला सप्टेंबरमध्ये ‘नॅक’ समिती भेट देऊन पाहणी करेल. त्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. उत्तम मानांकन मिळ‌ण्यासाठी तयारी केली आहे.” शिवशरणमाळी, कुलसचिव
‘नॅक’ समितीच्या भेटीचे मिळाले पत्र

- नॅक रिअॅक्रिडेशन : २२
- नॅक अॅक्रिडेशन : १७
- एनबीए मानांकन : ०२

एसीयू आदी संस्थाचा समावेश
विविध मान्यता
एफयूजीसी
बारा यूजीसी
एआययू
एनसीटीई

तपासणीसाठी विद्यापीठ सज्ज
विद्यापीठाचीगुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी ‘नॅक’ परीक्षण गरजेचे आहे. गुणवत्तेचा आग्रह विद्यापीठ धरीत आहे, तो किती रूजला गेला आहे, याची ही तपासणी असेल.” डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू

पाच संकुले
- १० पदव्युत्तर अभ्यासक्रम
- ३२ व्यावसायिक कोर्स
- २००६ मध्ये डिजिटल युनिव्हर्सिटीची घोषणा
- संशोधन प्रकल्पांसाठी १४३.१२ लाख मंजूर
- प्राध्यापकांच्या प्रसिद्ध ५७६ शोधनिबंधामुळे ६३६३ इम्पॅक्ट फॅक्टर
- डिजिटल युनिव्हिर्सिटी, व्हीजन २०२० आयटी पॉलिसी

विद्यापीठ दृष्टिक्षेपात
नॅक समिती म्हणजे बेंगलोर येथील नॅशनल अॅसेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन कौन्सिलने विद्यापीठ नामांकन तपासणीसाठी नियुक्त केलेली समिती. ही सहा सदस्यांची समिती विद्यापीठाची गुणात्मक तपासणी करते त्या आधारावर नामांकन प्रदान करते. समितीमध्ये परराज्यातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, कुलगुरू किंवा अनुभवी ज्येष्ठ प्रोफेसर अशांचा समावेश असतो.
नॅक म्हणजे..