आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ, पिलानी रिसर्च सेंटरमध्ये संशोधनासाठी सामंजस्य करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ राजस्थानमधील पिलानी येथील सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यात संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. 
या वेळी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, सेंटर इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट पिलानीचे प्रा. डॉ. जमील अक्तर, मॅक्वीन इंडियाचे संचालक डॉ. जी. आर्येन, प्र. कुलसचिव बी. पी. पाटील यांची उपस्थिती होती.
 
या करारासाठी पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. एल. पी. देशमुख डॉ. जमील अक्तर, पिलानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी पदार्थ विज्ञान संकुलाचे संचालक डॉ. एस. एस. सूर्यवंशी, प्रा. व्ही. बी. पाटील, डॉ. बी.जे. लोखंडे उपस्थित होते. या कराराद्वारे संशोधनासाठी चालना मिळणार आहे.
 
संशोधक विद्यार्थ्यांना शिरी, पिलानीकडून संशोधन सुविधा मिळतील. विद्यार्थ्यांना शिरी पिलानीच्या नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सोलापूर विद्यापीठ, शिरी पिलानी यांच्यामध्ये पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून सहकार्य वाढणार आहे. 
 
संशोधन करारांतर्गत संशोधनाची दिशा 
तारविरहित सेन्सरमार्फत फळे भाज्या यांच्या प्रतीची तपासणी, गॅसगळती त्यावरील नियंत्रण करणे. शेतकऱ्यांसाठी पाणी नियंत्रण यंत्रणा, पॉलिमर अर्धवाहकाच्या सहाय्याने वायू चाचणी करणे, मायक्रो, नॅनो सेन्सरसाठी यंत्रणा उभी करणे. 
 
कणविरहीत स्वच्छ प्रयोगशाळेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्यार्थी शिक्षक आदान-प्रदान, भेटी, अॅरो जेल तयार करणे, चर्चासत्र आयोजित करणे. सामंजस्य करारप्रसंगी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, प्रा. डॉ. जमील अक्तर, डॉ. जी. आर्येन, प्र. कुलसचिव बी. पी. पाटील, पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. एल. पी. देशमुख उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...