आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ संघाला पारितोषिके, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या संघाने ३१ व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके मिळवत राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवाचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठाच्या संघाने मूकनाट्य प्रथम, स्थळचित्र द्वितीय तर सुगमगायन, लघुनाटिका कातरकामात तृतीय क्रमांक मिळाला आहे. संघ सोलापूरकडे येण्यासाठी रवाना झाला आहे. शनिवारपासून पश्चिम विभागीय युवा महोत्सव गुजरातच्या आणंद येथे सुरू होता.
या महोत्सवासाठी सोलापूर विद्यापीठाचा संघ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. हनुमंत मते यांच्या नेतृत्वाखाली दोन संघव्यवस्थापक ३५ विद्यार्थ्यांसह सहभागी झाला. यामध्ये विद्यापीठाच्या संघाने २२ कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता. मूकनाट्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याने विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवासाठी जाणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर संघ जात आहे. हे विशेष आहे. कारण यापूर्वी सोलापूरचा संघ ललित कला, चित्र निर्मिती चित्र यामुळे राष्ट्रीय पातळीवरील युवा महोत्सवासाठी दाखल झाले होते.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
सोलापूर विद्यापीठाच्या संघाने दर्जेदार कलाविष्काराच्या बळावर पाच पारितोषिके खेचून आणली आहेत. तसेच सोलापूर संघाला मूकनाट्यात प्रथम पारितोषिक मिळाल्याने संघ राष्ट्रीय स्तरीवरील महोत्सवासाठी निवडला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवासाठी पहिल्यांदाच जात आहे. विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे. प्रा.हनुमंत मते, संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ