आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुभेज गावात ऊस जाळण्याचे सत्र सुरुच, शेतकरी हवालदिल; 6 शेतकर्यांचा ऊस जाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माढा तालुक्‍यातील कुंभेज गावात मागील 8 दिवसांपासुन ऊस पेटवून देण्याचे सत्र सुरुच असुन यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अज्ञात इसम दोन दिवसांच्या अंतराने ऐन छाटणीस आलेला ऊस जाळत आहे. यामुळे या गावातील शेतकरी सध्या ऊसाची राखण करीत आहे.

 

सुभाष नागटिळक, महादेव कापसे, बाबु सरवदे, इन्नुस काझी, दिलखुश काझी, पोपट आलदर या सहा शेतक-यांचे उस आता जाळण्‍यात आले आहेत. या सहा शेतकर्याचे जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकर्यांनी माढा पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.  चौकशी केलयानंतर संबधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यानी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...