आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाची धडक; माेहोळ तालुक्यातील चौघांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - मोबाइल टॉवर लाइनचे काम करून परतणाऱ्या पाच जणांच्या कारला अज्ञात वाहनाने जाेराची धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना कुरूल-कामती रोडवर मंगळवारी पहाटे घडली.

उमाकांत शिवशेट्टी (वय ३४, रा. वाघोली, ता. मोहोळ), रामा कदम (वय ४७ रा. वाघोली, ता. मोहोळ), विनोद गायकवाड (वय २८, रा. कामती, ता. मोहाेळ), मनोज बनसोडे (वय ३२, रा. पेनूर, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे अाहेत. लक्ष्मण फाळके (वय ३०, रा. वाघोली) हे गंभीर जखमी झाले आहेत. उमाकांत मधुकर शिवशेट्टी हे इंडस टेलिकॉम टॉवर या कंपनीमध्ये टॉवरच्या देखभाल -दुरुस्तीचे काम करतात. त्यांच्यासमवेत मनोज, विनोद , रामा आणि लक्ष्मण हे पाच जण कारमधून (क्रमांक एमएच १४, सीएस ५१४४) मोहोळ येथील टॉवरचे काम करण्यासाठी आले होते. कामती पोलिस ठाणे सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे हे पथकासह रात्रीच्या गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना ही अपघातग्रस्त कार निदर्शनास आली. त्यांनी तातडीने गंभीर जखमी लक्ष्मण फाळके यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

वाहनाचा शाेध सुरू
हाअपघातप्रत्यक्ष पाहणारा कोणीही नव्हता. त्यामुळे नेमक्या कोणत्या बाजूनेे आणि कोणत्या वाहनाने कारला धडक दिली हे अाता तरी सांगता येत नाही. समोरील वाहन अवजड असावे हे अपघाती कारची अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येते. कामती चौकापासून तेरामैल, सोलापूर आणि मोहोळ या मार्गावर एखादे अपघातग्रस्त वाहन गेले आहे, का याबाबत चौकशी सुरू आहे. संजीवझाडे, सपोनि, कामती पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...