आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कीर्ती गोल्ड’ची विनापरवाना गोदामे; बोरामणी तलाठी, मंडलाधिकारी यांची भूमिका संशयास्पद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील कीर्ती गोल्ड ऑईल कंपनीने विना परवाना हजारो चौरस फूट गोदामांचे बांधकाम केले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचा लाखो रुपयांचा शुल्क बुडाला आहे. विशेष म्हणजे कीर्ती गोल्ड कंपनी महामार्गाशेजारी असतानाही तलाठी, मंडलाधिकारी यांचे या अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष कसे झाले ? हा प्रश्न आहे. विशेष याप्रकरणी तहसीलदार प्रांत कार्यालयाकडे परवानगी घेतल्याची कोणतीच नोंद नाही. कंपनीने विनापरवाना केलेले बांधकाम पाहता यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडाला आहे. यामुळे आता प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालय कंपनीवर कोणती कारवाई हा प्रश्न आहे. 


सोलापूर-हैदराबाद महामार्गाशेजारीच कीर्ती गोल्ड तेल कंपनी आहे. कंपनीकडून गेल्या दोन वर्षापासून विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये कंपनीने नवीन दोन गोदामे नवीन मोठ्या टाक्या बांधल्या आहेत. शासन नियमाप्रमाणे कंपनीने प्रांत कार्यालयांकडून बांधकाम परवाना घेणे अपेक्षित असताना विनापरवाना बांधकाम करून त्याचा वापर सुरू केला आहे. कंपनीने महामार्गाशेजारीच बांधकाम सुरू असताना बोरामणी तलाठी, मंडलाधिकारी यांना हे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास कसे आले नाही ? यावर प्रश्नचिन्ह आहे. याबाबत चौकशी हाेणे गरजेचे आहे. 


परवानगी घेतलीच नाही.. 
प्रांताधिकारीज्योती पाटील यांनी संपर्क साधला असता, बोरामणी येथील कीर्ती गोल्ड कंपनीने बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. तहसीलदार कदम यांनीही आमच्याकडे अशी कोणती परवानगी मागितली नाही. याप्रकरणी मंडलाधिकारी यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. दक्षिण सोलापूर तहसीलदार प्रांताधिकारी यांना विचारले असता, गोदाम बांधकाम प्रकरणी आमच्याकडे कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे स्पष्ट केले. तहसीलदार कार्यालयाने कीर्ती गोल्ड कंपनीने गोदामाचे बांधकाम कधी केले ? किती केले आहे ? याचा मंडलाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...