आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यासाठी आणखी एक उर्दू शाळा मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - उर्दूमाध्यमांच्या शाळांची संख्या कमी असल्यामुळे आणि उर्दू भाषिक विद्यार्थी जास्त असल्यामुळे प्रत्येक वार्ड, कॉलनी, शहराच्या जवळील वसाहतीत उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, जिल्ह्यात तुळजापूर शहरात एका नवीन उर्दू शाळा मिळत असल्याचे गटशिक्षणाधिका-यांच्या सर्वेक्षणात निश्चित झाले आहे. त्याप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यात एका नवीन उर्दू शाळेसाठी शिक्षण उपसंचालकांकडे अहवाल दाखल केला आहे.

शाळेतील अंतराची अट शिथील करून वॉर्ड, कॉलनी, शहराच्या जवळील नवीन वसाहत, शहरसदृश्य भागात ७००० उर्दू भाषिकांच्या लोकसंख्येसाठी एका उर्दू माध्यमाच्या शाळेला मान्यता देण्यात येणार आहे. यासाठी ३० जूनपर्यंत लोकसंख्येनुसार आवश्यक शाळेचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक व्ही. के. खांडके यांनी दिले होते. त्याप्रमाणे शिक्षणाधिका-यांनी सर्व गटशिक्षणाधिका-यांना उर्दू शाळांची गरज निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. गटशिक्षणाधिका-यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात केवळ तुळजापूर शहरात उर्दू शाळेची गरज असल्याचे निश्चित झाले आहे. त्याप्रमाणे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी शिक्षण उपसंचालक वैजीनाथ खांडके यांना जिल्ह्यात तुळजापूर शहरात एक शाळा आवश्यक असल्याचा अहवाल पाठवला आहे. शहरी भागात एका वॉर्डात अथवा एका कॉलनीत ७००० उर्दू भाषिक नसल्यामुळे शाळा निश्चित करण्यास अडचण येत आहे. ज्या भागात अथवा वाॅर्डात ७००० लोकसंख्या आहे, तेथे पूर्वीच शाळा असल्याचे समोर आले आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या कमी असल्यामुळे आणि उर्दू भाषिक विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, लोकसंख्येच्या अटीमुळे जिल्ह्याला म्हणावा तेवढा फायदा झाला नाही.

जिल्ह्यात जवळपास उर्दू माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. यामध्ये उस्मानाबाद शहरात १३ हजार लोकसंख्या असून दोन उर्दू माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे नवीन शाळा मिळवता आली नाही. तुळजापूर शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या हजारापेक्षा अधिक असल्यामुळे तेथे नवीन एक उर्दू शाळा मिळण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यातील शहरात अथवा वाॅर्डात शासनाच्या निकषाप्रमाणे लोकसंख्या नसल्याने शाळा निश्चितीसाठी अडचण येत आहे. उर्दू शाळा निश्चितीसाठी अंतराची अट शिथील केल्याने जिल्ह्याला उर्दू माध्यमिक शाळा मिळण्याची शक्यता होती. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागात आवश्यक मुस्लिम लोकसंख्या नसल्यामुळे शाळा मिळणे अशक्य झाले आहे. पूर्वी अंतराच्या अटीमुळे तर आता लोकसंख्येच्या अटीमुळे पुन्हा उर्दू शाळा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.

शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी भागात लोकसंख्येनुसार शाळा निश्चित करण्यासाठी गटशिक्षणाधिका-यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, जिल्ह्यात एकमेव तुळजापूर शहरात उर्दू शाळा निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यातील शहरी भागात शाळा निश्चित करण्यास लोकसंख्येचा निकष अडचणीचा ठरत असावा.'' औदुंबरउकिरडे, माध्यमिकशिक्षणाधिकारी, उस्मानाबाद.