आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक गुलालास द्या प्राधान्य !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती, गुणाधीश गणपतीचे स्वागत मोठ्या जल्लोषात होतो. तितकाच जल्लोष लाडक्या बाप्पाला निरोप देतानाही असतो. प्रचंड उत्साहात गुलालाची मुक्त उधळण होते. पण हा गुलाल कशाचा आहे? त्यात कशाचे मिश्रण आहे? याचे भान राहात नाही. लेझीमचा अखंड ठेका, घामेघूम झालेले शरीर आणि त्यावर चिकटलेला गुलाल. ही स्थिती आरोग्यासाठी घातक ठरणार आहे. कारण गुलालात बेसुमार भेसळ होत असल्याने, त्याचा त्वचेवर डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. बनावट गुलाल उधळल्यामुळे बेहाल होऊ शकाल.
३०० मंडळे : सोलापूरशहरात सात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळे आहेत. त्यांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये साधारण ३०० मंडळे सहभागी होतात.

पोती प्रत्येकी: एकामंडळाकडून सरासरी पोती (प्रत्येकी २५ किलो ग्रॅमच्या, किंमत ३५० रुपये) गुलाल उधळला गेला तर साधारण लाखांचा खर्च होतो.

पाकळ्या उधळा : गुलालावरखर्च करूनही भक्तांच्या अारोग्यावर परिणाम होत असेल तर योग्य आहे काय? त्यापेक्षा फुलांच्या पाकळ्या उधळाव्यात. त्याने वातावरण प्रसन्न राहील आणि भक्तीला उधाण येईल.
तज्ज्ञ म्हणतात, अन् पंडितही सांगतात...
- गुलालामध्ये रासायनिक द्रव्यांचे मिश्रण
- श्वसन अन् त्वचा विकारांची शक्यता
- कानात गेल्यास बहिरेपणा येऊ शकतो
- अॅलर्जी, खोकला, घशाचे विकारही
असा बनावटपणा
बनावटगुलाल तुलनेत वजनदार असतो. तो हवेत उडत नाही. अंगावर किंवा डोक्यावर पडल्यावर जळजळ होते. बनावट गुलाल खरबरीत असतो. या निकषाच्या आधारे बनावट गुलाल सहज ओळखणे शक्य आहे. ते आेळखा. त्यापासून दूर राहणेच योग्य.
अशी होते भेसळ
मार्बलच्याभुकटीचा वापर करून गुलालात भेसळ केली जाते. चुना, माती, फक्की रांगोळीदेखील मिसळली जाते. बनावट गुलालाला गुलाबी रंग येण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर केला जातो. त्यात अॅसबेटॉस आणि सीलिका ही घातक द्रव्ये असतात.
असे उद््भवू शकतात विकार
पारंपरिक गुलाल
पूर्वीवापरला जाणारा गुलाल हा पारंपरिक पर्यावरणपूरक तयार करण्यात येत होता. त्यामध्ये चिंचोक्याची भुकटी, गेरू, पळसाच्या फुलांपासून तयार केलेला रंग आदींचा वापर व्हायचा. आता ही पद्धत राहिलेली नाही. सर्रास बनावट गुलाल बनवण्यात येतो.
पाकळ्या उधळणार
रमेशआडम, अध्यक्षताता गणपती
पूर्वभाग मानाचा ताता गणपती मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देणारा आहे. डॉल्बीविना विसर्जन मिरवणूक ही संकल्पना मंडळाने रुजवली. हा आदर्श घेत इतर मंडळही डॉल्बी आणत नाहीत. यंदा मंडळाने गुलालाऐवजी गुलाबाच्या पाकळ्या उधळण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या प्रतिक्रिया: तुमच्यानावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा
शरीराची काळजी घ्या
डॉ.शीतलकुमार शहा, सोलापूर
गुलालात दोन प्रकारचे रासायनिक द्रव्ये असतात. एक रंग येण्यासाठी विषारी रसायनांचा वापर करतात. त्यात अॅसबेटॉस किंवा सीलिका यांचा वापर हाेतो. हे घटक आरोग्यास घातक अाहेत. हा गुलाल श्वसनावाटे शरीरात गेल्यास अॅलर्जी, खोकला, घशाचे विकार उद््भवू शकतात. त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांचे विकारही होऊ शकतात.
नैसर्गिक गुलाल
माऊलीसुगंधी, गुलालाचेव्यापारी
गुलालामध्ये अलीकडील काळात ‘ऱ्होडामाइन’ हे रसायन मिसळले जाते, जे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक अाहे. अशा गुलालाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्याचे दर स्वस्त होते. आम्ही नैसर्गिक गुलाल विकतो.
सुमारे लाखांचा गुलाल उधळतो
गुलाल वंदनीय आहे
पं.वेणूगोपाल जिल्ला, सोलापूर
पौराणिक काळापासून गुलालाचा वापर पूजेत होत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या एक सुगंधित द्रव्य म्हणून गुलालाचा वापर केला जातो. गुलाल कपाळावर लावण्याची प्रथा आहे. कपाळामध्ये आज्ञाचक्र असल्याने स्थिर विचार राहण्यासाठी कपाळावर गुलाल लावण्यात येतो.
कानाला इजा : गुलालकानात गेल्याने त्यातील रासायनिक कण अातील पडद्यावर परिणाम करू शकतात. त्याने इजाही होते.
श्वसन विकार : गुलालातीलरासायिक द्रव्याने अॅलर्जी, घसा श्वसनाचे विकारही उद्भवू शकतात. जे दूरगामी परिणाम करतात.
त्वचेचे आजार : निकृष्टदर्जाच्या गुलालामुळे त्वचारोग होण्याची भीती असते. त्याचे त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतात.
अंधत्व येऊ शकते : डोळ्यातरासायनिक गुलाल गेल्याने बुब्बुळाला इजा होते. या इजेमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...