सोलापूर - आर्थिक परिस्थिती सुधारल्याने बेदरकारपणा आला. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे. अपघातांची संख्या कमी करायची असेल तर अधिकाधिक प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे, असे मत विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मंगळवारी सकाळी सोलापूर अागाराच्या डेपोत रस्ता सुरक्षितता मोहिमेच्या उउद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर, विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांची उपस्थिती होती. प्रशांत अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले. अश्वजित जानराव यांनी प्रास्ताविक, सदाशिव कदम यांनी आभार मानले.
साठवर्षांपासून एसटी प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. राज्यातील सर्वात जुने महामंडळ म्हणून राज्य परिवहनला ओळखले जाते. अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे चालकांच्या चुकामुळे होणारे अपघात. चालकाचे वाहनावर नियंत्रण नसल्याने अपघात होतात. चालकांनी नियम पाळल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल.’- नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी बजरंग खरमाटे, नामदेव चव्हाण, प्रशांत अमृतकर, श्रीनिवास जोशी आदी.
रस्तासुरक्षा ही केवळ अभियानापुरतीच मर्यादित राहू नये. कायम अमलात यावी अपघाताचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे तर काही ठिकाणी कमी झाले आहे. देशात ८० टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे होतात. १८ टक्के रस्ते चांगले नसल्याने तर टक्के अपघात गाडीचे फिटनेस चांगले नसल्याने होते.’ - बजरंगखरमाटे, परिवहन अधिकारी
आम्ही सेवेचादर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न करू. पूर्वी समाज राष्ट्रीयकरणाकडे वळला होता. त्यानंतर बदलासाठी तो खासगीकरणाकडे वळला. येत्या दहा ते पंधरा वर्षांत पुन्हा देशात राष्ट्रीयकरणाचे वारे वाहू लागतील. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी चालक हा चांगला पाहिजे. जो वाहन चालविताना कमीत कमी ब्रेक आणि हॉर्नचा वापर करतो त्याला चांगला चालक म्हटले जाते.’ - श्रीनिवासजोशी, विभाग नियंत्रक