आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोटाविरहित यंत्रमाग करा, केंद्र देणार २५ हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उत्पादनवाढ आणि कारखान्यातील आवाज कमी करण्यासाठी धोटाविरहित यंत्रमाग (रॅपिअर लूम) बनवून घ्या. त्यासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे उपसंचालक डी. रविकुमार यांनी दिली. ११ कारखानदार एकत्र आले तर त्यांना सामूहिक सुविधा मिळतील, असेही ते म्हणाले.

केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या प्रादेशिक अायुक्तालय (नवी मुंबई)ने गुरुवारी येथे कार्यशाळा घेतली. त्या वेळी ते बोलत होते. सहायक संचालक सिद्धेश्वर डोंबे, तांत्रिक अधिकारी ए. आर. मामड्याल, सूर्या मशिनरीचे राहुल शहा, नरेंद्र वन्नम, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी शाखेचे व्यवस्थापक श्रीनिवास पतकी, वस्त्रोद्योग खात्याचे प्रादेशिक उपसंचालक किरण सोनवणे आदी उपस्थित होते.

यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी स्वागत केले. अनेक कारखानदारांनी एका छताखाली येऊन उत्पादने घेतल्यास त्यांना सामूहिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. स्वयंचलित पन्ना (रुंदी) कमी असलेले ४८ किंवा मोठा पन्ना असलेले २४ यंत्रमाग या छताखाली आणू शकता. त्यासाठी बांधकामाला प्रती चौरस फूट ३०० रुपये अनुदान मिळेल. प्रती लाभार्थी २२ लाख रुपयांचा लाभ मिळवू शकतो. यंत्रसामग्री कार्यान्वित केल्यानंतर २० टक्के अर्थसाहाय्य मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्यात येण्याची गरज आहे.

दर्जावाढीची योजना
साध्या यंत्रमागांना रॅपिअर कीट बसवण्यासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान अाहे. यात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे कारखानदार असतील तर हे अनुदान वाढीव आहे. याची माहिती तांत्रिक अधिकारी मामड्याल यांनी दिली. त्याची माहिती घेण्यासाठी दर्जावाढ केलेल्या समूहांना (क्लस्टर्स)भेट देण्यासाठी यंत्रमागधारकांना हजार देण्यात येणार आहे. रेल्वेने येण्या-जाण्याचा खर्च म्हणून मिळतो. यंत्रमागधारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सूत बँकेसाठी काेटी निधी देणार
किमान११ सदस्य असलेल्या एका कारखानदार गटाला ‘सूत बँक’ तयार करता येईल. ही बँक नोंदणीकृत सहकारी संस्था, विश्वस्त संस्था किंवा कंपनी असावी. त्यांना कोटी रुपयांपर्यंत व्याजमुक्त निधी मिळेल. हा निधी केवळ सूत खरेदीसाठीच वापरता येईल. वर्षांच्या कालावधीसाठी सरकारच्या हिश्श्याच्या ५० टक्के निधी बँक हमी दिल्यावर केंद्र सरकार देणार आहे.

वस्त्रोद्योग पार्कला ४० कोटी रु.
एकात्मिकवस्त्रोद्योग पार्क योजनेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक ४० कोटी रुपये मिळतील. कारखानदार एकत्र येऊन जमीन, इमारत, यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यासाठी गुंतवणूक करायची आहे. जी पायाभूत सुविधांपेक्षा दुप्पट खर्चाचे असणार आहे. त्याच्या ४० टक्के अनुदान केंद्राकडून मिळेल.
बातम्या आणखी आहेत...