आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - काँग्रेस अन्य समविचारी पक्षांकडून प्रस्ताव आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी करेल. यासाठी सर्व अधिकारी स्थानिक नेत्यांना दिलेे आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीसाठी येथे बुधवारी (दि. २१) पक्षाची बैठक घेण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये तटकरे बाेलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे उपस्थित होते.

तटकरे पुढे म्हणाले की, सध्याच्या भाजपने केंद्र राज्यात खोटी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केली. कोणतीही आश्वासने पाळता आलेली नाहीत. यामुळे शेतकरी, युवक अन्य समाजात रोषाचे वातावरण आहे. सध्या बैठकाच्या माध्यमातून राज्यात दौरा करत असताना ही परिस्थिती समोर आली आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची तयारी आहे. मात्र, तसा प्रस्ताव या पक्षांकडून येणे आवश्यक आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये त्या - त्या नेत्यांना अधिकार देण्यात आले आहेत. पक्ष यावेळी कोणत्याही स्थानिक आघाडीमध्ये सहभागी होणार नाही. सर्व उमेदवार पक्षाच्या अधिकृत चिन्हावरच निवडणुका लढवणार आहेत. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांबाबत शासन गोंधळलेले आहे. सुरुवातीला एका, नंतर दोन नगरसेवकांचा प्रभाग असल्याचे जाहीर करण्यात आले. महानगरपालिकेचा प्रभाग चार नगरसेवकांचा असल्याचे जाहीर करण्यात आला. जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची भूिमका सुरुवातीला जाहीर करण्यात आली. मात्र, याबद्दल काहीही अादेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. सर्व प्रयोग करूनही भाजपला यश मिळालेले नाही. यामुळे असा गोंधळ होत आहे, असा आरोप तटकरे यांनी केले.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांवर विधानसभेच्या निवडणुकीचे खापर फोडत असल्याबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की, ती सर्व वक्तव्ये स्थानिक स्वरुपाची आहेत. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न केले होते. नंतर विधानपरिषद निवडणुका एकत्र लढण्यात आल्या. आताही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असलेल्या निवडणुका एकत्र लढवल्या जात आहेत.

‘ते’विधान दुर्दैवी :प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित मराठा समाज मोर्चा काढत आहे, हे मुख्यमंत्र्यांचे विधान दुर्दैवी आहे. भाजपने धनगर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत गोंधळ निर्माण केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावता मराठा, आदीवासींच्या आरक्षणाला धक्का लावता धनगर समाजाला तर अल्पसंख्याक समाजाला आरक्षण द्यावे, ही पक्षाची भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

युवकांना स्थान
शरद पवार यांनी जाहीर केल्यानुसार युवक युवतींना तिकीट वाटपामध्ये ५० टक्के वाटा देण्याबाबत धोरण ठरवण्यात आले असल्याचे तटकरे यांनी सांगितले. युवक नेत्यांना पुढे आणणारा राष्ट्रवादी एकमेव पक्ष आहे. १९९९ मध्ये तर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेत्यांना नेतृत्व दिले.

शासनाची आणीबाणी
कौटुंबिक अन्य कारणांमुळे १०० पर्यंतच्या संख्येने लोक जमत असतील तर पोलिसांचा परवाना घेण्यात यावा, अशा कायद्याचा मसुदा तयार झाला आहे. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांनी आता अाणीबाणी लादण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगून तटकरे म्हणाले, याबाबत मुख्यमंत्रीच गोंधळलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...