आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समस्या जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी बाजारात; ग्राहक, विक्रेत्यांची ससेहोलपट थांबण्याची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - चिखलांमुळे ग्राहकांचा होणारा त्रास तसेच जागेअभावी विक्रेत्यांची होणारी हेळसांड जाणून घेण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे रविवारी (दि. २१) थेट आठवडी बाजारात पोहोचले. त्यांनी येथील विक्रेते, व्यापारी ग्राहकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. आठवडी बाजार मैदानाचे रुपडे बदलण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करून आठवडी बाजाराची व्यथा समोर आणली हाेती.
प्रत्येक रविवारी भरणाऱ्या शहरातील आठवडी बाजारात विक्रेते, व्यापारी शहरासह परिसरातील हजारो ग्राहक येथे भाजीपाला साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र, पावसामुळे चिखल निर्माण झाला तर सर्वांनाच मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे चांगलीच कसरत करावी लागते. मैदानातील अनेक भागात विक्रेत्यांना तेथे बसता येत नाही. यामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत बसून काही विक्रेत्यांना विक्री करावी लागते. यामुळे वाहतूक, गर्दी, नुकसान अशा अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ सर्वांवर येते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने दि. ऑगस्टला “उस्मानाबादचा आठवडी बाजार माखला चिखलाने’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे दि. १६ ऑगस्टला झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बाजाराच्या सुधारणेचा ठराव संमत करण्यात आला. ‘दिव्य मराठी’ने वृत्तामध्ये मांडलेल्या प्रत्येक बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी मुख्याधिकारी मनोहरे रविवारी (दि. २१) बाजारात आले. त्यांनी सुमारे दोन तास फिरून सर्व बाबी तपासून पाहिल्या. सर्व समस्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोबत असलेले स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे संभाजी राजे यांना सूचना दिल्या. मनोहरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन नेमकी काय समस्या आहे, याबाबत विक्रेते, व्यापारी ग्राहकांची मते जाणून घेतली. यावेळी सर्वांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यानुसार मनोहरे यांनी पालिकेचे कर्मचारी ठेकेदार आशु सय्यद, अमोल शिंदे यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

२०० टेम्पोची पार्किंग : मालाचेसुमारे २०० टेम्पो येथे उभारलेले असतात. त्यांच्या पार्किंगची व्यवस्था मैदानाच्या कडेला करण्यात येणार आहे. यामुळे सध्या बेशिस्तपणे टेम्पो उभे केल्यानंतर आटणारी जागा वाचणार आहे.

रोजचा बाजार हवा :देशपांडे स्टँडजवळील दररोज भरणारा बाजार या आठवडी बाजार मैदानात हलवण्याची गरज आहे. यामुळे रोज तेथे हाेणारी वाहतुकीची कोंडी होणे वाचणार आहे.
स्वच्छतागृहबांधणार :परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबाबतही मनोहरे यांनी सूचना केली आहे. यासाठी वेगळ्या योजनेतून आर्थिक तरतूद करण्याबाबतही विचार केला जाणार आहे.

कर वसूल करणाऱ्या ठेकेदारांना ओळखपत्र
परिसरातील काही नागरिक पहाटेच मोक्याच्या जागेवर कट्ट्यांवर पोते टाकतात. यामुळे व्यापाऱ्यांना जागा सापडत नाही. तेव्हा हेच नागरिक प्रत्येकांकडून २० रुपये वसूल करून जागा मोकळी करून देतात. यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अधिकृत ठेकेदार त्यांच्या सहकाऱ्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेऊन ओळखपत्र दिले जातील.
जागा होणार मोकळी
मैदानाच्या पूर्वेकडील सुमारे दीड ते दोन एकर जागेवर मोठ्या प्रमाणात उंचवटे निर्माण झाले आहेत. तसेच याच मोकळ्या जागेचा उपयोग स्वच्छतागृहाप्रमाणे होत आहे. यामुळे दुर्गंधी लांबवर येत असल्यामुळे लगतच्या दीड एकरवर कोणी विक्रेता बसत नाही. पाऊस आला तर याच भागात घाण पाणी साचते. या प्रकारामुळे सुमारे तीन ते साडेतीन एकर जागा निरुपयोगी ठरत आहे. या जागेचे सपाटीकरण स्वच्छता करण्याचे आदेश मनोहरे यांनी दिले आहेत.
कट्ट्यांची डागडुजी
बाजारातील कट्ट्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. यामुळे कट्ट्यावरील फरशी उखडून गेली आहे. खडी उघडी पडली आहे. कट्यावर बसणेही अशक्य झाले आहे. बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. ही बाब निदर्शनास आणल्यावर मनोहरे यांनी कट्ट्यांची तात्पुरती डागडूजी सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...