आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरा बरडे ‘मिस एथनिक सोलापूर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरची उत्तरा पुरुषोत्तम बरडे-बचुटे ‘मिस एथनिक सोलापूर’ ठरली आहे. तर सानिया सावस्कर दुसरी आली. एथनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट क्राफ्टविला.कॉमने ही ‘मिस एथनिक इंडिया’ स्पर्धा घेतली. पारंपरिक वेशभूषेसाठी ही स्पर्धा झाली. रुचिका पाटील मिस एथनिक महाराष्ट्र तर मोनिशा डोळ्ये (आसाम, लखिमपूर) ही मिस एथनिक भारत ठरली. शहर, राज्य आणि देश पातळीवर अशी तीन टप्प्यांत स्पर्धा झाली.

सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. पहिल्या टप्प्यात अॉनलाइन प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत ठरावीक वयोगटातील मुलींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. पहिल्यांदा आपला पारंपरिक वेशभूषेतील फोटो अपलोड करावयाचा होता. त्यानंतर राज्यानुसार यातून रँडमली निवड होणार होती. शहर पातळीवर उत्तराची निवड झाली. पुढील टप्प्यासाठी पुन्हा स्वत:चा एक मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करणे अपेक्षित होते. यातही तिच्या व्हिडिओची निवड झाली. पण राज्य पातळीवर ती मागे पडली.

२५ ऑक्टोबरला मिळाले पत्र
उत्तरानेआपली संस्कृती, परंपरा आणि स्वत:ची ओळख तिने याद्वारे करून दिली. राज्यभरातून २१२ जणांत तिची मिस एथनिक सोलापूर म्हणून निवड झाली. नुकतेच तिला २५ ऑक्टोबरला या निवडीचे पत्र प्राप्त झाले.

उत्तरा उच्च शिक्षित
उत्तराचेशालेय शिक्षण दमाणी शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण वालचंदमध्ये झाले. वेल्लूरच्या व्हीआयटीतून उच्च शिक्षण पूर्ण केले. बंगळुरूच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये आणि सोलापुरातील सिंहगड महाविद्यालयात ती विद्यादानाचे कार्यही करते आहे.