आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखाचे दोन मंगळसूत्र दोन वेगवेगळ्या घटनात लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातदोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरांतून दोन सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहेत.
बेडरूममधून मंगळसूत्र चोरले
पहिली घटना कुमठा नाका येथील जयभवानी सोसायटीत ते जानेवारी दरम्यान रात्री घडली. सोना दशरथ शिंदे (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. त्या मंगळसूत्र उशीखाली ठेवून बेडरुममध्ये झोपल्या होत्या. रात्री बाथरुमला जाण्यासाठी पतीने बेडरुमला बाहेरून कडी लावली. तेवढ्यात चोराने बेडरुमची कडी काढून प्रवेश करत ३२ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. सकाळी पाहिल्यानंतर उशीखाली मंगळसूत्र नव्हते, असे फिर्यादेत नमूद आहे. बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे साठ हजार आहे. सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

सायंकाळी घरातून लंपास
दुसरीचोरीची घटना लोकसेवा हायस्कूलजवळील सत्यसाईनगर येथे घडली. दार पुढे करून चोराने चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी वाजता घडली. याबाबत महेश नागप्पा कोंचीकोरवी यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मंगळसूत्राची किंमत बाजारभावाप्रमाणे ८० हजार रुपये आहे.