आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डवळकरांच्या ‘वारूळ’चा डंका, ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ५६ व्या राज्य नाट्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून समर्पित नाट्य मंदिरच्या राजेंद्र पोळ लिखित व अश्विनी तडवळकर दिग्दर्शित वारूळ या नाटकाने प्रथम, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेच्या मुकंुद हिंगणे लिखित बेकरार या नाटकाला द्वितीय तर युवा रसिक संस्थेच्या आनंद खरबस लिखित परीघ या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत सोलापूर केंद्रातून १३ नाटकांचे सादरीकरण झालेे. त्यात वारूळ, बेकरार व परीघ या नाटकांनी घवघवीत यश मिळवले. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अश्विनी तडवळकर (वारूळ), द्वितीय प्रमोद खांडेकर (बेकरार), उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक स्त्री अश्विनी तडवळकर (वारूळ), रौप्य पदक पुरुष श्रीनिवास देशपांडे (वारूळ), प्रकाश योजना प्रथम जयप्रकाश कुलकर्णी (वारूळ), द्वितीय गणेश मरोड (परीघ), नेपथ्य प्रथम नीलेश कट्टीमणी (वारूळ), द्वितीय प्रसन्न गायकवाड (परीघ), रंगभूषा प्रथम विनोद सुरवसे (रात संपता संपेना), द्वितीय नितेश फुलारी (बेकरार).

अभिनय प्रमाणपत्रे : अनिता संगमवार (निवडुंग), संध्या माने (खट्टा मिठ्ठा), अनुजा मोडक (हिल टॉप व्हिला), वैदेही अष्टपुत्रे (पावसाअाधीचा पाऊस), अमोल देशमुख (परीघ), प्रमोद खांडेकर (बेकरार), दत्ता वाघमारे (रात संपता संपेना), अमित मोरे (माय नेम ईज पांडुरंग) यांनीही पारितोषिके प्राप्त केली.
बातम्या आणखी आहेत...