आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्ग आणि मानवातील नाते जिवंत ठेवणे हेच पर्यावरण रक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते जिवंत ठेवणे, ते अधिकाधिक वृद्धिंगत करणे हेच पर्यावरण रक्षणाचे सूत्र होऊ शकते. केवळ निसर्ग वाचविणे म्हणजे पर्यावरण रक्षण म्हणता येणार नाही, लेखक, पत्रकार, विचारवंत आणि सुज्ञजनांनी आपापल्या कार्याद्वारे पर्यावरण रक्षणास चालना देता येऊ शकते, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर यांनी गुरुवारी येथे केले.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे उद््घाटन श्री. वळसंगकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वीरेंद्र चित्राव, प्रा. नरेंद्र काटीकर, एम. श्रीधर, दैदिप्य वडापूरकर आदी उपस्थित होते.

पर्यावरण विषयावरील शॉर्टफिल्मचे सादरीकरण झाले. बारवा या जागतिक पातळीवर गाजलेल्या चित्रपटाचा ट्रेलर यानिमित्त दाखविण्यात आला. दुसरा चित्रपट क्रुड. याद्वारे अॅमेझॉन नदीच्या खाेऱ्यात उभारलेल्या पेट्रोलियम कंपनीमुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाल्यााचे वाास्तवदर्शन घडले.

उद््घाटन सत्रानंतर कार्यशाळेत श्री. वळसंगकर म्हणाले, ‘केवळ वाइल्ड लाइफ म्हणजे पर्यावरण नव्हे. हा विषय खूप विस्तृत व्यापक आहे. पर्यावरण रक्षणाचे कार्य करण्यासाठी प्रत्येकाने जंगलात जाऊन रक्षण कार्य करणे अपेक्षित नाही तर आपापल्या कार्यक्षेत्रात राहून त्या दिशेने जागृती साधली पाहिजे.’
छायाचित्र प्रदर्शन
राज्यातील छायाचित्रकारांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन वसुंधरा महोत्सवानिमित्त फडकुले सभागृहातील कलादालनात भरविण्यात आले आहे. याचे उद््घाटन वीरेंद्र वळसंगकर यांच्या हस्ते फीत कापून झाले. विविध पर्यावरण विषयक छायाचित्रांंचा यात समावेश आहे. स्थानिक छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचाही समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...