आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री शिंदे, कुमार यांना वीरशैव पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अखिल भारतीय वीरशैव महासभेचे पुरस्कार जाहीर झाले असून यंदाच्या वर्षी सुशीलकुमार शिंदे यांना वीरशैव रत्न तर इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. किरण कुमार यांना वीरशैव भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार १८ सप्टेंबर राेेजी सकाळी ११ वाजता मुंबईच्या नरिमन पाॅइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कार्यक्रमास काशीपीठाचे जगद््गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, अखिल भारतीय महासभेचे अध्यक्ष डॉ. शामनूर शिवशरणाप्पा, माजी अध्यक्ष भीमण्णा खंडरे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा, भारत फोर्जचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी, कर्नाटक अध्यक्ष एन. तिप्पणा आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वीरशैव रत्न तर इंडीयन सायन्स रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेवर डॉ. किरण कुमार या वीरशैव शास्त्रज्ञाची निवड झाल्याबद्दल हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात वीरशैव समाजातील आमदार, खासदार, मंत्री उच्चपदस्थ अधिकारी यांना वीरशैव श्री तर डॉ. शामनूर यांना दान रत्नाकर हा पुरस्कार देण्यात येत आहे. पत्रकार परिषदेस विजयकुमार हत्तुरे, बसवराज बगले, विजयकुमार हंचाटे, गणेश चिंचोळी, दशरथ वडतिले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...