आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाने चिरडल्याने तिघांचा मृत्यू, मृतांत बापलेकीचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मूर्तिजापूर येथून किलोमीटरवर असलेल्या सोनोरीजवळ मंगळवारी, सप्टेंबरला दुपारी वाजताच्यादरम्यान झालेल्या दुचाकीच्या अपघातात बापलेकीसह तीन जण जागीच ठार झाले. तालुक्यातील जामठी बुद्रुकचे प्रकाश शालीग्राम राऊत(४०), देवेंद्र हरिश्चंद्र सरदार(४२) सानिका देवेंद्र सरदार (१५) या तिघांचा बाभुळगावहून जामठीकडे स्प्लेंडर प्लस (क्रमांक- एमएच- ३० एएस ३७७९) दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यातून उसळून झालेल्या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. देवेंद्र सरदार यांची मुलगी सानिका अकोल्याजवळील बाभुळगावच्या नवोदय विद्यालयात शिक्षण घेत होती. तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला गावी आणत असताना हा अपघात झाला. अपघात होताच तिघेही फेकल्या गेले. दरम्यान, मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे तिघांचाही घटनास्थळीच करुण अंत झाला. ठाणेदार गजानन पडघन, उपनिरीक्षक खांडेराव, तोपकर लवकरच घटनास्थळी पोहोचले. रात्री उशीरापर्यंत अज्ञात वाहनाचा तपास सुरू होता. एसडीपीओ कल्पना भराडे यांनी शवविच्छेदन गृहाला भेट देऊन माहिती घेतली.
पावसाळ्याला ब्रेक तरीही खड्डे दुर्लक्षितच
दैनिक ‘दिव्य मराठी’ने या आधी महामार्गावरील खड्ड्यांबाबत वृत्त प्रकाशित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महामार्गावरील खड्ड्यामुळे आज तीन जीव गेले. याबाबत विचारणा केली असता पावसाळ्यात रस्ते खराब होतातच, ज्यामुळे खड्ड्याचे काम पावसाळ्यानंतर असे उत्तर प्राप्त होतात. मात्र, पावसाला मागील १५ दिवसांपासून ब्रेक असताना खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काय? असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे
बातम्या आणखी आहेत...