आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन परवान्यासाठी कोट्यात केली वाढ, शिकाऊ परवान्याचा कोटा १५०

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वाहनचालवण्याचा पररवाना काढण्यासाठी लागणाऱ्या ऑनलाइन अपाॅइंटमेंट कोट्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाढ केली आहे. त्यामुळ‌े आता शिकाऊ परवान्यासाठी रोज १८० जणांना बोलावण्यात येणार आहे. पूर्वी १६० जणांचा कोटा होता, तर कायमस्वरूपी परवन्यासाठी कोटा १०४ वरून १५० करण्यात आला आहे.

राज्य सरकारने ऑनलाइन अपाॅइंटमेंट अनिवार्य केले. त्यामुळे वेटिंगची पद्धत सुरू झाली. त्यामुळे वाहनचालकांना मोठी अडचण होत आहे. पुढची अपॉइंटमेंट दोन-तीन महिन्यांनी मिळत होती. याविरुद्ध ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कोट्यात वाढ करण्यात आली. ती आता आणखी वाढवण्यात आली असून गुरुवारपासून लागू झाली.

आॅनलाइन चाचणी यंत्रणेत बिघाड
आॅनलाइन चाचणी यंत्रणेत गेल्या तीन दिवसांपासून बिघाड झाला आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी मॅन्युअली काम सुरू केले आहे. दुरुस्तीचे प्रयत्न असून अद्याप यंत्रणेतील दोष दूर झालेले नाहीत. परिणामी वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. तेथे उभ्यानेच प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. तासन् तास उभे राहावे लागते.

सर्व्हरमध्ये दोष
ठेवण्यातआली.याची माहिती संबंधितांना देण्यात आली. तसेच, हा दोष लवकरात लवकर दूर करण्यासही सांगितले आहे.” बजरंग खरमाटे, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...