आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अारटीअो’त जप्त वाहनांचे सुटे भाग जाताहेत चोरीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त करून अाणलेल्या वाहनांचे सुटेभाग चोरीला जात अाहेत. यापूर्वीही अनेकदा या घटना घडल्या अाहेत. गुरुवारी तर एका तरुणाने रिक्षाची बॅटरी चोरीला गेल्यामुळे अधिकाऱ्याच्या जीपची काच फोडली. हा संताप वाढतोय. यावर नियोजन होणे गरजेचे अाहे. जप्त करून अाणलेल्या वाहनांची सुरक्षा घेणार कोण, असा प्रश्न समोर येतोय.
अारटीअो कार्यालयात रात्री सुरक्षा रक्षक नसतात. जप्त करून वाहने लावलेल्या ठिकाणी प्रखर दिव्यांचा झोतही नसतो. भविष्यात अाणखी मोठा प्रकार घडण्यापेक्षा अाताच सावध होणे अपेक्षित अाहे.

रिक्षाची बॅटरी चोरीला गेल्यामुळे चिडलेल्या तरुणाने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमाराला जीपची फोडली. अारटीअो अधिकारी संकेत चव्हाण यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिल्यानंतर सैफन मुनवरबाशा शेख ( रा. दोन नंबर झोपडपट्टी, विजापूर नाका, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांची मालवाहतूक रिक्षा (एमएच १३ एएन ८३५२) फिटनेस प्रमाणपत्र संपल्यामुळे ही कारवाई झाली होती. ते रिक्षा पाहणी करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात अाले. याबाबत विचारणा करण्यासाठी ते चव्हाण यांच्याकडे गेल्यानंतर दोघात वाद सुरू झाला. चोरीला गेलेली बॅटरी कोण भरून देणार असे म्हणत असताना मेमो अाणा, पाहूयात असे चव्हाण म्हणाले. यानंतर बाहेर थांबवलेल्या जीपवर (एमएच ०४ ईपी १३००) दगडफेक केली. सुमारे ९००० हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

शेख यांना ताब्यात घेऊन कलम १५१ प्रमाणे कारवाई करून सोडून दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी शुक्रवारी दिली. वारंवार घडणाऱ्या चोरीबाबत विचारले असता, अारटीअो कार्यालयात वाहने जप्त करून अाणल्यानंतर त्या भागात प्रखर दिवे लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे अाहे. चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही लावले पाहिजेत. रात्रगस्त पेट्रोलिंग पथकाला तपासणी करण्यासाठी सूचना देऊया, असे ते म्हणाले.

चोरी नवीन नाही, उपाययोजना पाहिजे
जप्त केलेल्या वाहनांच्या बॅट-या, रिम, टायर अन्य महागडे साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण अाहेच. यापूवीॅही वषर्षभरात ८-१० घटना घडल्या अाहेत. वाहने जप्त करून अाणले तरी त्याची सुरक्षिततेची काळजी कोण घेणार. नागरिकांचा हा मनस्ताप अाहेच. जप्त केलेल्या वाहनांची चोरी होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे अाहे. चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही पाहिजेत. प्रखर विदयुत झोत असणारे दिवेही लावावेत. तरच या घटना रोखतील. मागील महिन्यात रिक्षाचे साहित्यही चोरीला गेले होते. विजापूर नाका पोलिसांनी तपास करून माहिती समोर अाणल्यानंतर फियाॅदीच अारोपी निघाला होता.

सुरक्षा रक्षक नेमण्यात येईल
^कार्यालय परिसरात सीसीटीव्ही अाहेत. सुरक्षा रक्षक नेमणे अन्य उपाययोजना करण्यासाठी नियोजन करू. घटनेचे चित्रीकरण अाले अाहे का ते पाहून पोलिसांना सीडीअार देण्यात येईल. जप्त केलेल्या वाहनांचा निपटार कसा लवकर होईल याबाबत नियोजन करूयात. शुक्रवारी पोलिस उपायुक्तांशी चचर्चा केली अाहे. रात्रगस्त वाढविण्यासाठी सूचना देणार अाहेत. तसेच सोमवारी अामचे अधिकारी पोलिसांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढूयात.” बजरंगखारमाटे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...