आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रिटायरिंग रूमचे रूप लवकरच पालटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवाशांच्या सुविधेसाठी स्थानकावर असलेल्या रिटायरिंग रूम व डॉरमेटरीचे नूतनीकरण केले जाणार आहे. सध्या साध्या धाटणीची असलेली वेटिंग रूम आगामी काळात डिलक्स रूपात असतील. अाैरंगाबादसह ए वन अाणि ए दर्जाच्या देशातील सहाशे रेल्वे स्थानकावरील डॉरमेटरी व रिटायरिंग रूमचे नूतनीकरण आयआरसीटीसी करणार आहे.
आयआरसीटीसीने हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. मंजुरी मिळताच याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल. या सुविधेमुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भुसावळ, साेलापूर, शिर्डी अहमदनगर अादी महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना पंचतारांकित निवासाची सुविधा मिळू शकतील. देशातील सर्वच प्रमुख स्थानकांवर सुविधा उपलब्ध आहे. हॉटेलच्या तुलनेने या खोल्या अथवा बेड अगदी माफक दरात प्रवाशांसाठी उपलब्ध असतात. आरक्षित तिकिटांवर जवळपास ७२ तासांसाठी प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येतो. यात वातानुकूलित व साध्या अशा दोन्ही प्रकारच्या खोल्यांचा समावेश असतो. त्याचे दरही वेगवेगळे असतात.
तुलनेने याचे दर कमी असल्याने प्रवाशांची पहिली पसंती डॉरमेटरी व रिटायरिंग रुमसाठी असते. आता या खोल्या ऑनलाइनदेखील बुक करता येत असल्याने अनेक जण ई तिकीट काढतानाच रुमची उपलब्धता बघूनच रूम बुक करत आहेत. आयआरसीटीसीने याच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. तारांकित हॉटेलच्या रूममध्येच वास्तव्याला आहोत, असे जाणवेल अशा दर्जाच्या या रिटायरिंग रूम असणार आहेत.

>पंचतारांकित हाॅटेलप्रमाणे मिळू शकेल प्रवाशांना सुविधा
>सोलापूरसह देशातील ए वन व ए दर्जाच्या स्थानकांचा समावेश
लवकरच निर्णय अपेक्षित
आयआरसीटीसीने देशभरातील सहाशे रेल्वेस्थानकांवरील रिटायरिंग रूम व डॉरमेटरीचे नूतनीकरण करण्याची तयारी रेल्वे बोर्डाला दर्शविली आहे. येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
संदीप दत्ता, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी
बातम्या आणखी आहेत...