आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावर लवकरच वायफाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या तीस मिनिटांसाठी ही सेवा मोफत असेल. त्यानंतर सेवाशुल्क आकारण्यात येईल. किती शुल्क आकाराचे याबाबत अद्याप ठरलेले नाही. येत्या काही दिवसात यावर निर्णय घेण्यात येणार आहे. चार ते पाच महिन्यात वायफाय सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नवी दिल्ली येथील रेलटेलचे सरव्यवस्थापक के. मनोहर राजा यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

गुगल रेलटेलच्या वतीने देशातील १०० प्रमुख महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा देण्याचे काम सुरू आहे. यात सोलापूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. नुकतेच रेलटेलच्या अधिकाऱ्यांकडून सोलापूर स्थानकची पाहणी झाली. यात ३५ ठिकाणी वायफायचे अॅक्सेस पॉइंट बसवण्याचे ठरले.

कशी मिळणार सेवा
रेल्व स्थानकावर प्रवासी दाखल झाल्यानंतर तो मोबाइलवर वायफाय ऑप्शन ऑन करेल. त्यानंतर संबंधित प्रवाशाचा मोबाइल क्रमांक सिस्टिम मध्ये रजिस्टर होईल. मोबाइल क्रमांक रजिस्टर झाल्यानंतर त्याच्या मोबाइलवरून वायफाय सेवा सुरू होईल.२४ तासांपैकी ३० मिनिटे मोफत वायफाय सेवेचा लाभ घेता येईल. २९ व्या मिनिटाला वायफाय सुरू ठेवायचे की बंद करायचे असा संदेश येईल.सेवा पूर्ववत ठेवायची आहे अशांना रिचार्ज करून वायफायचा आनंद घेता येईल.