आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील १०० प्रभावशाली कुलगुरूंमध्ये डाॅ. मालदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांची जगातील १०० प्रभावशाली कुलगुरूंमध्ये निवड झाली. महाराष्ट्रातील फक्त दोनच कुलगुरूंना हा बहुमान मिळाला. यानिमित्त वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसतर्फे त्यांचा मुंबई येथील ताज लॅण्ड एन्ड येथे गौरव करण्यात आला.

सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. एन. मालदार यांची निवड करताना त्यांचे प्रभावी धोरण, कार्यक्षम व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे ठरले. कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोलापूर विद्यापीठास १२ चा दर्जा मिळविणे, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विद्यापीठास अनुदान मिळविणे, नॅककडून मूल्यांकन करून घेणे, रूसामधून विद्यापीठास भरीव निधी प्राप्त करून घेणे, विद्यापीठाचे कामकाज पारदर्शक विद्यार्थी केंद्रित करणे तसेच विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये अत्यंत नावीन्यपूर्ण असे बदल करून विद्यापीठास राज्यात अग्रक्रमांकावर पोहचविले. विद्यापीठात अनेक भौतिक सुविधा निर्माण केल्या. या बाबीची प्रभावशाली कुलगुरूंच्या निवडीबाबत दखल घेण्यात आली.

सोलापूर विद्यापीठाने परीक्षा पद्धती अत्यंत पारदर्शक गतिमान केल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान केल्या आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विद्यापीठाची पहिली डी.एस्सी. ही मानद पदवी प्रदान केली. तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इ. पुरस्कार सुरू केले.

विद्यापीठाने शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, क्रीडा इ. क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या सन्मानासाठी जीवन गौरव पुरस्कार सुरू केला. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

विद्यार्थी सुविधांवर भर
सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये जसे रूपांतरित होणार आहे, त्याच धर्तीवर सोलापूर विद्यापीठ बनविण्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मानस आहे. डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू
बातम्या आणखी आहेत...