आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Kumar Kalam Patil, Municipal Commissioner Special Article In Divya Marathi

स्मार्ट सोलापूर आहे शक्य, कार्यशैली संस्कृतीत बदल घडवूयात..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय कुमार काळम-पाटील, आयुक्त महापालिका.
मोकळ्या प्लॉटवर पेड पार्किंगसाठी सुविधा आवश्यक आहे. बगीचासाठी राखीव भूखंड विकसित करताना शासन संमतीने पार्किंग बगीचा असा प्रयत्न होऊ शकतो. पोलिस आयुक्तांनी चार पुतळा चौकात बॅरेकेट्स टाकले होते. आम्ही तातडीने डिव्हायडर टाकून त्यांना मदत केली. नॅशनल हायवेकडे शहरातील फ्लायओव्हरसाठी पाठपुरावा करीत आहे.
इस्राइल आपल्यापेक्षाही अविकसित होता. अंगाला भस्म लावून लोक फिरत. वालुकामय प्रदेश, पाऊस नाही, इंडस्ट्री नाही, अशी अवस्था होती. इस्राईलने लोकांच्या वर्तनात, कार्यशैलीत अपेक्षित बदल घडवून आणला. कमी पाण्यात विकास साधल्याने जग अचंबित झाले. आपल्यालाही लोक, लोकप्रतिनिधी, प्रशासन अशा विविध स्तरावर प्रयत्न करून ‘स्मार्ट सोलापूर’ करता येईल. जीवनमान सुधारण्यासाठी तेथे जसे प्रयत्न केलेत. तसेच आपल्याला इथे करायला हवेत. स्लम भागाचा विकास म्हणजे फरशीकरण, नळ इतकाच अभिप्रेत नाही. बांधकाम व्यवसायिकांना गरजेनुसार वाढीव एफएसआय देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केला जाईल. स्मार्ट लोकजीवनमान हे महत्त्वाचे आहे.
इस्राइलमधील तेलअवीव आणि जेरूसेलम ही वृक्षाच्छादित स्मार्ट शहरे पाहून मी चकितच झालो. इस्राईल आपला देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. भारतानंतर नऊ महिन्यांनी इस्राईल स्वतंत्र झाला. गेल्या ५० वर्षांत त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून तेल अवीव उभारले आहे. आम्हालाही त्यांच्याप्रमाणेच ‘स्मार्ट सिटी’ निर्माण करणे शक्य आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे केवळ भौतिक बदल असे अभिप्रेत नव्हे. नागरी सेवा सुविधामधील सुसूत्रता हा प्रत्येकाच्या कार्यसंस्कृतीचा गाभा बनणे. शहराचा समतोल सर्वांगीण विकास महत्त्वाचा.
जेमतेम १५० मि.मी. पाऊसमान असलेल्या इस्राईलमधील ‘तेल अवीव’ शहर जगाच्या पाठीवर नवा बदल घडवून आणत असेल, तर सोलापुरातही तसा बदल घडवणे शक्य. यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. इस्राईलमध्ये महापालिकेचे कार्यकारी अधिकार महापौरांना आहेत. आपल्याकडे तशी पद्धत नाही.
महाराष्ट्रात असा प्रयोग मुंबई महापालिकेत झाला. परंतु बजेटपेक्षा अधिक खर्चांना मंजुरी दिली गेली. शासनाने वर्षभरातच दुरुस्ती केली. तेल अवीवची प्रशासकीय, सेवा सुविधा आॅनलाइन आहे. महापालिकेत २५ लोकही आपल्या कामासाठी आलेले नव्हते. तक्रारी, सूचना असल्या तरी लोक आॅनलाइन अर्ज करतात. आपल्याकडे ऑनलाइन सिस्टिम लागू करणे हाच पर्याय आहे. कार्यालयीन भाषा इंग्रजी असल्याने संवादात तशी अडचण नाही. आपल्याकडे मराठी ऑनलाइन संवादाची काहीप्रमाणात अडचण आहे. ‘माय गो’ साइट ही इंग्रजी भाषेत आहे. देवनागरी लिपी उपलब्ध असली तरी तिच्या वापरासाठी तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू. तेथील लोक स्वच्छतेबद्दल कमालीचे जागृत. नियमांची सक्त अंमलबजावणी तेथे आहे. रस्त्यावर कोठेही कचरा दिसत नाही.
चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांना मेजर फाइन केला जातो. आपल्याला लोकप्रबोधन करावे लागेल, लोक स्वयंप्रेरणेने ‘स्मार्ट’ होतील. कायद्याचा बडगा वापरून लोकांना नियमांचे पालन करायला लावणे, यापेक्षा लोकांच्या कार्यशैलीत बदल घडवून आणणे महत्त्वाचे वाटते, लोक ते करतील, असा विश्वास वाटतो. पाण्याला तेथे राष्ट्रीय संपत्ती समजली जाते. प्रायव्हेट बोअर, विहीर खोदाईला मान्यता नाही. तेथे वापरलेले पाणी ड्रीपच्या माध्यमातून झाडांना पुरवले जाते. आपल्याकडे पाण्याबाबतची सजगता कमी असली तर बदल घडवून आणता येईल. यासाठी लोकप्रतिनिधी चांगली भागिदारी करू शकतील. शहराला आजही दोन दिवसांआड पाणी देता येईल. स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा तेथे नाही. सर्व क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग आहे. आपणही नगररचनेच्या प्लॅनमध्ये पर्यावरणपूरक विकासासाठी नियोजन करून सोलापूर स्मार्ट करूयात. यासाठी हवे सर्वांचे सहकार्य...
- शब्दांकन: श्रीकांत कांबळे