आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करा, शिक्षणमंत्र्यांचे सर्व शाळांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- मुलांचेआरोग्य सुदृढ रहावे, यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, मुलाच्या वजनाच्या दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असेल, याची दक्षता घ्यावी, असे सर्व शाळांना पत्राद्वारे कळविले आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी लवकर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोवळ्या वयात मुलांच्या पाठीवर दप्तराचा भार वाढत आहे. त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत १० टक्के इतकेच वजन असावे, असा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी शाळांना शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास संागण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आजचा विद्यार्थी हा देशाचा नागरिक असून, देशाचे भवितव्य हे शाळेतील वर्गखोलीत घडते. हा देशाचा नागरिक पर्यायाने महाराष्ट्रातील विद्यार्थीसुध्दा सशक्त मनाने खंबीर असावा, असे मला वाटते. त्याचे आरोग्य ही त्याच्या यशाची, आयुष्याची गुरुकिल्ली आहे. या विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण तसेच दप्तराच्या ओझ्यामुळे येणारा शारीरिक ताण कमी करण्याचा माझा मनापासून प्रयत्न आहे. वैद्यकीय शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते दप्तराचे वजन हे विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के असावे. शासकीय पातळीवर त्यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत. सरकार, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत याच्या प्रती संपूर्ण जिल्ह्यात पाठविण्यात येत आहेत.
विद्यार्थी सशक्त मनाने खंबीर व्हावा, अशी शिक्षणमंत्र्यांची अपेक्षा.
१०टक्के इतकेच वजन असणे अपेक्षित आहे.
अनाठायी अपेक्षा
वास्तविकपाहता शिक्षण हसत-खेळत सुलभ पद्धतीने होणे विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. परंतु, पालक, शिक्षकांकडून या कोवळ्या वयात विद्यार्थ्यांकडून अनाठायी अपेक्षा ठेवल्या जात आहेत. यातूनच पुस्तक, वह्यांचे ओझे विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढत गेल्याने याचा शारीरिक बौद्धिक परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे.

शारीरिक वाढीवर परिणाम
दप्तराच्याभरमसाठ ओझ्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाठीवरील ओझ्यामुळे वाकून चालणे, मान दुखणे, पाठ, कबरदुखी आदी समस्या विद्यार्थ्यांना उद⃒्भवत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत. त्यातच या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

एका विषयासाठी एकाच पुस्तकाचा वापर करा
शालेयशिक्षणमंत्र्यांनी सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. यामध्ये वेळापत्रकात विषयानुसार योग्य तो बदल करावा दररोजच्या वेळापत्रकामध्ये तोड तासिकांचा समावेश असावा. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार बॅग भरण्याची सवय लावावी, प्रत्येक विषयाच्या वर्गपाठ गृहपाठाला स्वतंत्र वह्या करता दोन किंवा त्यापेक्षा अधिक विषयासाठी एकच वही करावी, पुस्तकांचा एक संच शाळेत एक संच घरी असावा (यासाठी मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुस्तके वापरावी), शुध्द पाण्याची सोय शाळेत उपलब्ध करून द्यावी, पूरक साहित्याचा अनावश्यक वापर टाळावा, एकाच विषयासाठी तीन- चार स्वतंत्र पुस्तके वापरली जातात, अशा शाळांमधील मुख्याध्यापकांनी एका विषयासाठी शक्यतो एकच पुस्तक निवडावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळांना पत्रव्यवहार
शासनाकडूनआलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सर्व शाळांना पत्रे पाठविली जात आहेत. शाळांना याबाबत योग्य ते नियोजन करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.'' शिवाजीरावजाधव, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक)