आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांना फारसे कोणी सीरिअस घेत नाही; तावडेंचे बोगस डिग्रीच्या टीकेला प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईवरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना फारसे कोणी सीरिअस घेत नाही असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
 
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज राष्ट्रवादी नेते आणि आमदार अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सडकून टीका केली होती. बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा असू शकतो?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता. पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
 
मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचे अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा होण्याऐवजी आज साजरा होत असल्याबद्दल त्यांनी तावडेंवर टीका केली. सरकारला शिक्षण आणि शिक्षकांबद्दल फारसे गांभीर्य नाही, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...