आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीची आयकर विभागाकडून तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - कार्तिकी यात्रेदरम्यान श्री विठ्ठलाच्या दानपेटीतील शंभर, पन्नास, वीस, दहाच्या नोटा गायब होऊन त्या जागी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा मंदिर समितीच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने विधी व न्याय खात्याने मंदिर समितीचा बँकेतील पैशांचा भरणा १४ नोव्हेंबरपासून बंद केला होता. त्यातच पुणे आयकर विभागाने मंदिर समितीला तपशील देण्यास सांगितले होते. पण मंदिर समितीने तपशील दिला नसल्यामुळे पंढरपूर आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी मंदिर समिती दानपेटीच्या १४ ते ३० नोव्हेंबरच्या पैशांची तपासणी केली. या मोजणीमध्ये ५०० च्या ६ नोटा तर १ हजाराच्या १२ नोटा मिळाल्या. पण १० ते १४ नोव्हेंबरपर्यंतच्या काळात ( केवळ चार दिवसांत ) एवढ्या मोठ्या प्रमाणात ५०० व १ हजार रुपयांच्याच नोटा दानपेटीत कशा आल्या, याचा शोध घेण्यात येत आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख म्हणाले, आयकर खात्याची कोणत्याही प्रकारची नोटीस आली नाही. कार्तिक यात्रेमध्ये जमा झालेल्या देणगीचा बँकेमध्ये भरणा केला. सध्या राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांबरोबरच विठ्ठल मंदिर समितीला ७ डिसेंबरपर्यंत माहिती देण्यासाठी आयकर विभागाचे पत्र आल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...