आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाची शासकीय महापूजा पाच तासांऐवजी दीड तासातच संपणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाच्याआषाढी एकादशीची शासकीय महापूजा पाच तासांऐवजी दीड तासात करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. पूजेचा कालावधी कमी झाल्यामुळे ८० हजारांहून जास्त वारकऱ्यांना आता विठूरायाचे पददर्शन मुखदर्शन घेता येणार आहे.

आतापर्यंत पाच तासांच्या कालावधीत तीनही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जायच्या. विधी मंत्र एकच, पूजा करणारी मंडळी वेगळी इतकाच काय तो फरक. प्रथम खासगीवाले यांच्याकडून पाद्यपूजा, मंदिर समितीकडून नित्यपूजा नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेवटची महापूजा व्हायची. पूजेसाठी रात्री १२ वाजताच मंदिर बंद केले जायचे. पूजा होईपर्यंत हजारो वारकरी दर्शन रांगेत तिष्ठत असायचे.

यंदाखासगीवाले यांची पाद्यपूजा बंद झाली. नित्यपूजा आणि महापूजा एकत्र केल्यामुळे दर्शनासाठी जादा वेळ मिळेल. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिल्याचे मुंढे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. एकादशीदिवशी अधिकाधिक वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन मिळेल. मुख्यमंत्री पहिल्यांदाच सोवळे नेसून श्री विठ्ठलाची पूजा करणार असल्याने शास्त्रोक्त पूजा होणार, हेही महत्त्वाचे. वासुदेवचवरे महाराज, प्रमुख, आंबेकर-आजरेकर फड

नित्यपूजा आणि महापूजा एकत्रच...
आषाढीसोहळ्यावेळी वारकऱ्यांची गर्दी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नित्यपूजा महापूजा एकदाच होईल. त्यामुळे पहाटे पाच वाजेपर्यंत चालणारा धार्मिक विधी यंदा २.१० वाजता पूर्ण करून पुन्हा दर्शन सुरू करण्यात येणार आहे. -तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी.

१.२० ते २.१० : विठ्ठल-रुक्मिणीचीनित्यपूजा महापूजा
मध्यरात्री १२.३०ते:गाभारास्वच्छता
ते १.२० : पाद्यपूजा
नवीन पूजेचे वेळापत्रक

मुख्यमंत्री नेसणार सोवळे...
नित्यपूजामहापूजा यंदा प्रथमच एकत्र होणार आहे. नित्यपूजा करताना सोवळे नेसणे अनिवार्य आहे. त्यामुळे यंदा मुख्यमंत्री फडणवीस सोवळे नेसून नित्यपूजा महापूजा करतील. अशी पूजा करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत.

अशी व्हायची पूजा...
मध्यरात्री १२.३० ते पहाटे वाजेपर्यंत पूजाविधीसाठी दर्शन बंद ठेवले जाई. या वेळेत गाभारा स्वच्छता, खासगीवाले यांची पाद्यपूजा, मंदिर समितीकडून नित्यपूजा तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यात येत होती. त्यामुळे विठू दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा हिरमोड होई. वारकऱ्यांना दर्शनसाठी विलंब होत असल्याने पूजेची वेळ कमी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...