आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला अडीच कोटी उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- आषाढीयात्राकाळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस विविध उपक्रमांद्वारे १५ दिवसांत दोन कोटी ६८ लाख ९६ हजार ५१४ रुपये उत्पन्न मिळाले. तसेच या काळात १५ लाख ११ हजार ८२५ भाविकांनी श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श मुखदर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दिली. 

डॉ. देशमुख म्हणाले, २४ जून ते जुलै या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद होते. मंदिर २४ तास उघडे होते. त्यामुळे भाविकांकडून ओवाळणीच्या स्वरुपात श्री विठ्ठलाच्या पायावर ४२ लाख ५१ हजार ५८९ रुपये तर रुक्मिणीच्या पायावर सात लाख ६५ हजार ८८३ रुपये जमा झाले. तसेच एक कोटी ३९ लाख ५३ हजार १०२ रुपये देणगीतून मिळाले. तसेचएक कोटी ३९ लाख ५३ हजार १०२ रुपये देणगीतून मिळाले. 

लाडू प्रसाद (३३ लाख पाच हजार १२०), राजगिरा लाडू (सहा लाख ५० हजार ३००), जमीन खंड (१३ हजार ६४५), फोटो विक्री (९१ हजार २००), वेदांत भक्त निवास (एक लाख ८१ हजार ६००), व्हिडिओकॉन भक्त निवास (एक लाख ७० हजार ८००), भक्त निवास (३२ हजार २५०), अन्नछत्र (सात हजार ५००), अन्नछत्र कायम ठेव (चार लाख ५६ हजार १२२), महानैवेद्य मुदत ठेव (७५ हजार), मनिआॅर्डर (३९ हजार ६१७), साडी विक्री (६८ हजार ६५०), नित्यपूजा (२५ हजार), श्री विठ्ठल विधी उपचार (१५ हजार), चंदन पावडर (सात हजार ३००), हुंडीपेटी पंचनामा (१५ लाख ४४ हजार ६४४), परिवार देवता (आठ लाख एक हजार ३७३), जमा पावती (एक लाख १३ हजार ६५१), स्टेट बँक खाते जमा (चार हजार १५३), एनईएफटीद्वारे भक्तनिवास भाडे (९३ हजार ९५०), मुदतठेव व्याज (८८ हजार ७६८ ), आॅनलाइन पाद्यपूजा (पाच हजार), आॅनलाइन अन्नछत्र कायम ठेव (पाच हजार), आॅनलाइन गोशाळा देणगी (१०१), आॅनलाइन अन्नछत्र देणगी (१५ हजार २०८), आॅनलाइन देणगी (एक लाख १४ हजार ९८८). 

१५ लाख भाविकांना दर्शन 
यात्राकाळात १५ लाख ११ हजार ८२५ भाविकांनी श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श, मुखदर्शनाचा लाभ घेतला. यात सहा लाख ६५ हजार ९७३ भाविकांनी पदस्पर्श, आठ लाख ४५ हजार ८५२ भाविकांनी मुखदर्शन घेतल्याची माहिती देशमुख यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...