आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकानंद व्याख्यानमाला : अत्रे आणि पु.ल मराठी साहित्यात उत्तुंग शिखरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट - आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्यातील उत्तुंग शिखरे असल्याचे मत मसापाचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी केले.विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना जोशी बोलत होते.

जोशी यांनी आपल्या व्याख्यानात पुल आणि अत्रे यांचे अनेक किस्से सांगितले.अत्रेंचा विनोद हा रांगडा होता तर पु.ल. चा विनोद हा संयमी, सुशिल, शालिन होता. घरंदाज बाईप्रमाणे समाजात पु.ल. चा विनोद वावरला तर अत्रेंचा विनोद अवखळ मुलाप्रमाणे समाजात वावरला. दिगंबर फडके या नवोदित लेखकाच्या कविता प्रकाशनाला गेल्यानंतर फडके अत्रेंच्या विरोधात बोलल्यावर अत्रें फडकेला म्हणाले दिगंबर तुमच्या नावाला तुमच्या अडनावाने संभाळले आहे. जपून वागा असा सल्ला दिला. विनोद हा अत्रेचा एक स्थायीभाव होता. प्रसंगनिष्ठा, स्वभावनिक अशा सर्व प्रकारच्या विनोदाची मुक्त उधळण त्यांनी केली. साध्या साध्या प्रसंगातून उत्तम विनोद करणारे आचार्य अत्रे हे एकमेवाव्दितीयच होते. सडेतोड उत्फुर्त असा विनोद नेहमी अत्रे करायचे.

पुलंचे विनोद गुदगुल्या करणाऱा, त्यांच्या विनोदाला एक साहित्यीक शालीनता होती. वार करणारा विनोद पुल.नी केला नाही. विनोदाची कारंजी उडवण्यांच विलक्षण सामर्थ्य पु. ल. मध्ये होता. तीन कवींचे सत्कार करताना ड्रीपल डोस घेतल्या शिवाय त्यांच्या कविता ऐकता येत नाही. स्वत:च्या ढेरीला वेतन वाढ संबोधण्याच विनोदबुध्दी अपूर्वच होती. विनोद करण्याची रीत त्यांच्या विलक्षण होती. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, अभय दिवाणजी, पदमाकर कुलकर्णी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...