आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर आणि अकोल्यात 2 मतदारांचा मृत्यू, पैसे वाटप करताना राष्ट्रवादीचे 13 अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगाधर शेटे - Divya Marathi
गंगाधर शेटे
सोलापूर/अकोला- मतदानाचा हक्क बजावताना सोलापूर आणि अकोल्यात 2 मतदारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापुरात प्रभाग क्रमांक. 8 मधील ग. ल. कुलकर्णी प्रशालेत मतदानासाठी गेलेलेले गंगाधर शेटे (70) यांचा मतदान केंद्रातील रॅम्पवरुन त्यांचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, मतदान करुन घरी परतल्यानंतर ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकोल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दीपक खानझोडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खानझोडे अकोल्यातील गोरक्षण रोडवरील कैलास नगर भागात राहात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक खानझोडे हे अकोला अर्बन बँकेत नोकरीला होते. मतदान आटपून घरी आल्यानंतर दुपारी एक वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचाराच्या आधीच त्याची प्राणज्योत मालवली.

दुसरीकडे, भाजपचे उमेदवार सुभाष शेजवळ यांना पोलिसांची मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे जिल्हातील वेळापूर परिसरात मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात मतदान यंत्र बंद पडल्याचे चांगलाच गोंधळ उडाला आहे.  सकाळपासून दुसऱ्यांदा मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे मतदारांनी सांगितले. परिणामी मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

मंगळवेढा परिसरात मतदारांना वाटले पैसे...
मंगळवेढा परिसरात मतदारांना पैसे वाटप करण्यात येत होते. कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी 67 हजार 100 रुपये आणि मतदार याद्या जप्त केल्या आहेत. दरम्यान मतदानाच्या दिवशीच पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
बातम्या आणखी आहेत...