आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक पाटील, रजनीश जोशी, विनय नारकर यांना वसुंधरा मित्र पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- किर्लोस्करउद्योग समूह सृजन फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदाच्यावर्षी २३ ते २६ जुलैदरम्यान सोलापुरात आयोजिला आहे. ‘शून्य कचरा- सुरुवात आपल्यापासून’ ही महोत्सवाची प्रमुख संकल्पना असल्याचे किर्लोस्कर फेरसचे प्रशासनाधिकारी ऋषीकेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. कुलकर्णी म्हणाले, “देशातील सहा प्रमुख राज्यांमधील २८ शहरांमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सोलापूर येथील महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्षे असून, त्या मोहिमेचा शुभारंभ करण्याचा बहुमान सोलापूरला मिळतो. पर्यावरण, वन्यजीव, ऊर्जा, हवा पाणी या प्रमुख पाच विषयांना समर्पित असणारा हा महोत्सव आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा वसुंधरामित्र पुरस्कार यंदाच्यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाचे माजी उपसंचालक अशोक पाटील, पत्रकार रजनीश जोशी विनय नारकर यांना देण्यात येईल. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात तीन दिवस होणाऱ्या महोत्सवाच्या निमित्ताने छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. २३ जुलैला दुपारी अडीच वाजता सोलापूर विद्यापीठात महोत्सवाचे उद््घाटन होईल.याप्रसंगी पर्यवारण क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन होईल.

शुक्रवारी (दि. २४) पर्यावरण दिंडी, चित्रकला स्पर्धा, चित्रपट महोत्सवाचे उद््घाटन पुरस्कारांचे वितरण होईल. शनिवारी (दि. २५) ग्रीन कॉलेज- क्लीन कॉलेज स्पर्धा, हेरिटेज वॉक, शालेय विद्यार्थ्यांसाठी हसत-खेळत पर्यावरण आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येतील. रविवारी (दि. २६) सकाळी नेचर वॉक होणार आहे.

छायाचित्र चित्रकला स्पर्धा
महोत्सवाच्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी ‘शून्य कचरा- सुरुवात आपल्यापासून’ या संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजिली आहे. छायाचित्र ३०० रिझुलोशनमध्ये आठ ते दहा इंच स्वरूपातील असावेत. इच्छुक छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धा सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना पारितोषिक देण्यात येणार असून, इच्छुकांनी डी. जी. कोंगेर (मो. ९४२२३८०६०७) यांच्याशी संपर्क साधावा. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्याच विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजिली आहे.
बातम्या आणखी आहेत...