आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ल्याच्या तटबंदीवरून बनवता येईल पावणेदोन कि. मी. लांबीचा वाॅकिंग ट्रॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी ही केंद्र सरकारची संकल्पनाच मुळात विकसित होत असलेली संकल्पना आहे. कोट्यवधी लोकांच्या आयडिया शेअरिंगमधून साकार होणारी ही योजना आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्यापासून एक उत्सुकता तीव्र होत चालली आहे की नेमके कसे असेल स्मार्ट सोलापूर? या अनुषंगाने बुधवारी एक भन्नाट विचार समोर आला. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर पावणेदोन किलोमीटर लांबीचा वाॅकिंग ट्रॅक बनवता येईल. तलावाच्या मध्यभागी असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरासह किल्ला परिसर स्मार्ट सोलापूरचा आत्मा बनू शकतो.
रस्ते, वीज, ड्रेनेज, नागरी सुविधा, मार्केट हे मूलभूत मुद्दे तर देशभरातील सर्व स्मार्ट सिटीत असणार आहेत. यासोबतच स्थानिक स्तरावर उपलब्ध सामुग्रीचा स्मार्ट सिटीसाठी कल्पकतेने वापर कसे करणार यावरून वेगळेपण ठरू शकेल अशी क्षमता सोलापूरच्या भुईकोट किल्ला परिसरात आहे. या परिसराचा पर्यटन केंद्रित विकास झाल्यास धार्मिक आस्थेची जोड मिळेल. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याचा गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे, पुण्यातील आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुधीर चव्हाण यांनी नवा विचार मांडला. बुधवारी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांच्यासमोर तो सादर केला. यावेळी स्मार्ट सिटीच्या सीईओ अमिता दगडे, उद्यान विभागाचे माजी अधिकारी ज्ञानराज म्हेत्रस, "दिव्य मराठी'चे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांची उपस्थिती होती.

संग्रहित छायाचित्र
लाइट साउंड शो : बाजूला रम्य तलाव आहे. किल्ल्यावर लाइट साउंड शो केल्यास पर्यटकांना तो आकर्षून घेईल. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल.

तबेल्याचे पुनरुज्जीवन : किल्ला म्हटला की तबेला असतोच. या किल्ल्यातही तो आहे. या ठिकाणी अनेक घोड्यांची व्यवस्था केल्यास बालगोपाळांना सफरीचा आनंद घेता येईल.

संग्रहालय : किल्ल्यात काय काय आहे याची ठळक माहिती तेथे असणे आवश्यक आहे. किल्ल्यातील ३६ शिलालेखांचे संग्रहालय करता येऊ शकेल.

माहिती केंद्र : किल्ल्यात गेल्यावर चौकात माहिती केंद्र आहे. येथे किल्ल्याची माहिती द्यावी. त्यामुळे तेथे फिरताना नेमकी माहिती मिळेल.

भुईकोट किल्ल्यात करता येतील या गोष्टी
मोहोळ येथील मूळचे रहिवासी. सोलापुरात सिद्धेश्वर प्रशालेत चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण. सातार सैनिक स्कूलमध्ये बारावीपर्यंत. कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी महाविद्यालयात १९९२ मध्ये बीई अार्च, १९९४ मध्ये नागपूरमधील व्हीएनअायटी मधून नगररचना विषयातून एम. अार्च.पूर्ण. यासाठी कोयना धरण फुटले तर कराड शहर कसे वाचवता येईल यावर लघुप्रबंध सादर केला. यानंतर २०१५ मध्ये पुणे विद्यापीठातून वास्तूसंवर्धन विषयात एम. अार्च. अभ्यासक्रम पूर्ण केला. यासाठी सोलापूर भुईकोट किल्ल्यावर लघुप्रबंधसादर केला. जानेवारी २०१५ मध्ये नागपूर विद्यापीठातून पीएच.डी.पूर्ण केलेली अाहे. वास्तू अारोग्याचे नातेबंध असा संशोधनाचा त्यांचा विषय राहिला अाहे. भारती विद्यापीठ काॅलेज अाॅफ अार्किटेक्चरमध्ये १५ वर्ष प्राचार्य म्हणून काम पाहिले. सध्या ते सिहंगड काॅलेज अार्किटेक्चरमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत अाहेत.
सिध्देश्वर परिसरासाठीही हातभार
अार्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर सिध्देश्वर मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी सल्लागार म्हणून डाॅ.सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले. उपलब्ध निधीतून तलाव परिसर, लक्ष्मी मार्केट परिसरात प्रवेशद्वार, कारंजे अशी कामे केली होती.

लोकभावना शास्त्राची व्यवहारिक सांगड
वास्तू संवर्धन म्हणजे वास्तुची देखभाल असा अर्थ नव्हे. लोकभावना वास्तूशास्त्र याची व्यवहारिक सांगड घालून वास्तुचे जतन अपेक्षीत अाहे. वास्तुमध्ये लोकवावर असेल तरच ती संवर्धित होते. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याचे एेतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक महत्व नव्या पिढीसमोर अाणणे गरजेचे अाहे. किल्ल्याची पडझड रोखणे सौंदर्यकरणाच्या अंगाने उपायही सूचवलेले अाहेत. महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीत किल्ला संवर्धन घेतल्याने अानंद वाटतो.- डाॅ. सुधीर चव्हाण, प्राचार्य, सिंहगड, पुणे

सिंहगड वास्तुशास्त्र महाविद्यालयाची सल्लागार एजन्सी म्हणून तयारी
देशभरात नामांकित तिस-या क्रमांकाचे वास्तू संवर्धनातील डिपार्टमेंड सिंहगड काॅलेज अाॅफ अार्किटेक्चर येथे अाहे. महापालिकेने किल्ला संवर्धन हाती घेतले अाहे. महाविद्यालयाने त्यासाठी सल्लागार एजन्सी म्हणून तयारी दाखवली अाहे. महाविद्यालयाकडील अवगत तंत्र मनुष्यबळाच्या सहाय्याने किल्ल्याचे पुनरूज्जीवन होऊ शकते.

किल्ला परिसर नेमका कसा आहे, श्री सिद्धेश्वर मंदिर, तलाव, रिपन हाॅल, आखाडा आदींचे व्हिडीओ संकल्प चलचित्र डाॅ. चव्हाण यांनी यावेळी दाखवले. शुक्रवारी हाेणाऱ्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्याचे सादरीकरण पुन्हा करण्यात येईल.

स्मार्ट सिटीत समावेश करू
^किल्ला आणि ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर हा स्मार्ट सिटीचा आत्मा आहे. डाॅ. चव्हाण यांनी किल्ल्याचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांचे संशोधन उपयोगी आहे. २६ जून रोजी स्मार्ट सिटीचा शुभारंभ करण्यापूर्वी "पुरातत्त्व'शी पत्र व्यवहार करू. विजयकुमार काळम-पाटील, मनपा आयुक्त

किल्ल्याला पावणेदोन किलोमीटरची तटबंदी आहे. त्याला वाॅकिंग ट्रॅक म्हणून विकसित केल्यास देशातील स्मार्ट सिटींत सोलापूरचे वेगळेपण उठून दिसेल. तटबंदीवरच्या चढउतारामुळे चालताना चांगला व्यायाम होईल. सकाळच्या वेळी तेथे फिरण्यास येणाऱ्यांची संख्या वाढेल.
स्मार्ट सिटी ही योजना केंद्र सरकारची आहे. त्यामुळे किल्ल्याच्या मूळ रचनेला काही धक्का लावता होणाऱ्या सुशोभीकरणाला सहज परवानगी मिळणे शक्य आहे.
स्मार्ट सिटी बैठकीत उद्या पुन्हा सादरीकरण
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याचे अभ्यासक, पुण्यातील सिंहगड आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुधीर चव्हाण यांनी नवा विचार मांडला, मूळचे सोलापूरचे असलेले डाॅ. चव्हाण यांनी मनपा आयुक्त विजयकुमार काळमपाटील यांच्यासमोर सादर केले प्रेझेंटेशन
बातम्या आणखी आहेत...