आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोककळा : मंद्रूपमध्ये भिंत अंगावर पडून बालिका ठार, लहान भाऊ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत लक्ष्मी - Divya Marathi
मृत लक्ष्मी
दक्षिण सोलापूर- सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गल्लीत खेळणारी, बागडणारी लक्ष्मी सर्वांची लाडकी होती. बुधवारी सकाळी आईने तिच्यासह भावाला प्रातर्विधीस बसवून घरी जाते ना जाते तोच दोघा बहीण-भावंडाच्या अंगावर भिंत कोसळली. दगड-मातीच्या ढिगाखाली अडकल्याने लक्ष्मी जागीच ठार झाली. पण लहान भाऊ ओंकार बचावला. सर्वांची लाडकी लक्ष्मी अचानक गेल्याने मंद्रूपमध्ये शोककळा पसरली.

लक्ष्मी महांतेश काळे (वय ६) असे भिंत अंगावर पडल्याने ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. भाऊ ओंकार (वय २) हा किरकोळ जखमी झाला. याची माहिती अशी की, मुलगी लक्ष्मी मुलगा ओंकार यांना आई जयश्रीने सकाळी पावणेसातच्या सुमारास अंगणवाडीजवळ असलेल्या जुन्या भिंतीलगत प्रातर्विधीला बसवले. पाणी आणण्यासाठी ती परत घरी गेली. तेवढ्यात दगड-मातीची जुनी भिंत दोघांच्या अंगावर पडली. ओंकार बाजूला असल्याने त्याच्या अंगावर माती पडली. मात्र, लक्ष्मीच्या अंगावर डोक्यात मोठा दगड पडल्याने वर माती पडल्याने ती ढिगाऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू पावली.

अश्रू अनावर
भिंतपडताच लक्ष्मीचा काका रवी काळे इतरांनी धाव घेतली. डोक्यातील मेंदू बाहेर आलेल्या अबोल लक्ष्मीला मी उचलले. दररोज सकाळी माझ्या मांडी, खांद्यावर खेळणाऱ्या लक्ष्मीचा मृतदेह उचलण्याची वेळ आज आली. आमची मुलगी नव्हे तर काळे घराण्यातील जणू लक्ष्मीच आज गेली, अशी भावना व्यक्त करताना लक्ष्मीचे काका रवी काळे यांना अश्रू अनावर झाले.

घ्यावी काळजी
भिंतपडलेल्या ठिकाणी जवळच अंगणवाडी आहे. येथील ३० ते ४० मुले-मुली दररोज या भिंती जवळच सुटीत खेळत असत. बुधवारी भिंत कोसळली, ती सकाळी लवकरच. जर अंगणवाडीतील मुले भिंतीजवळ खेळताना हा प्रकार घडला असता तर मोठा गंभीर प्रसंग उद््भवला असता. ग्रामपंचायतीने गावातील जुनाट घरे पडीक भिंतींची काळजी घेणे गरजेचे.

खेळकर, बोलकी, ती सर्वांची होती लाडकी
महांतेशकाळे यांना लक्ष्मी ओंकार ही दोनच मुले. खेळकर सर्वांशी बोलणारी लक्ष्मी गल्लीत सर्वांची लाडकी होती. सहा वर्षांची असून ती आईला कामात मदत करायची. अंगणवाडीत हुशार होती. आज सकाळी ती हसत हसत आई काका रवी काळे यांना बोलली. हसत खेळत सर्वांशी बोलणाऱ्या लक्ष्मीचा दुर्दैवी मृत्यूचा चटका सर्वांना लागला.