आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग समिती सभापती निवड, सहा ठिकाणी झाली बिनविरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील आठ प्रभागांच्या समिती सभापती पदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक दोनच्या सभापती पदासाठी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी बंडखोरी केली. हे पाहून प्रभाग तीनमध्ये कॉँग्रेसच्या विरोधात भाजपने अर्ज दाखल केला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक आणि मध्ये उद्या निवडणूक होणार असून उर्वरित सहा प्रभागाचे सभापती अविरोध झाले आहेत.

प्रभाग क्रमांक मध्ये काँग्रेसच्या कल्पना यादव, मध्ये भाजपच्या कल्पना कारभारी, मध्ये काँग्रेसचे उदयशंकर चाकोते, मध्ये काँग्रेसचे इस्माईल शेख, मध्ये राष्ट्रवादीचे हारून सय्यद, मध्ये काँग्रेसचे सरस्वती कासलोलकर, मध्ये राष्ट्रवादीचे खैरुन्निसा शेख, मध्ये कॉँग्रेसचे विवेक खरटमल अशी नावे अंतर्गत निश्चित झाली होती. मात्र प्रभाग क्रमांक दोनमध्ये कॉँग्रेसच्या राजकुमार हंचाटे यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला. यामुळे भाजपने प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागेश वल्याळ यांचा अर्ज दाखल केला. यामुळे उद्या फक्त प्रभाग क्रमांक आणि मध्ये निवडणूक होणार असून उर्वरित सहा प्रभागातील निवड अविरोध झाली आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता स्थायी समिती सभागृहात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

महापालिकेत महेश कोठे गटाची प्रथम झलक
राजकुमार हंचाटे यांनी बंडखोरी करत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अर्ज दाखल केला. यांच्या अर्जावर सूचक म्हणून विठ्ठल कोटा आणि अनुमोदक म्हणून निर्मला नल्ला यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे फक्त हंचाटे यांनी बंडखोरी केली असून या तिघांनी बंडखोरी केली असे स्पष्ट होते. हे तीन सदस्य कोठे गटाचे असल्याने कोठे गटाची ही प्रथम झलक आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.

हंचाटे हे उद्या माघार घेतील
प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेसचे राजकुमार हंचाटे यांनी अर्ज दाखल केला असला तरी उद्या निवडणूकवेळी ते आपला अर्ज मागे घेतील. यामुळे सर्व प्रभागात अविरोध निवड होईल. संजय हेमगड्डी, पक्षनेता,महापालिका
बातम्या आणखी आहेत...