आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय अायुक्तांकडून प्रभाग रचनेचे प्रारूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात अालेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय अायुक्तांकडून शिफारशीसह राज्य निवडणूक अायोगाकडे सादर झाला अाहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्तावात काही बदल सुचवले होते. त्यानुसार दुरुस्ती करून अंतिम मंजुरीसाठी सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधित प्रभाग रचनेचे प्रारूप सादर केले असल्याची माहिती महापालिका उपायुक्त श्रीकांत म्याकलवार यांनी दिली.

महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार मागील पंधरवड्यात तयार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीने विभागीय आयुक्तांकडे सात सप्टेंबर रोजी तो प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आवश्यकतेनुसार प्रस्तावात काही बदल करून साेमवारी राज्य निवडणूक आयोगाकडे तो सादर केला. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून पालिकेने हे प्रारूप लोकसंख्येच्या आधारे तयार केलेले अाहे. प्रभाग रचनेत लोकसंख्येचा आधार घेतल्याने काही प्रभाग मोठे तर काही प्रभाग आकाराने लहान होऊ शकतात. दाट लोकवस्तीतील प्रभाग छोटे असतील.

पुढे काय?
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोग २३ सप्टेंबर राेजी आरक्षित प्रभागासह मान्यता देईल. सात आॅक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यात येणार आहेत.

सर्वात मोठे प्रभाग
जुळे सोलापुरात मोठ्या प्लाॅटधारकांची संख्या अधिक असल्याने लोकवस्ती विरळ अाहे. लोकसंख्येवर आधारित प्रभाग तयार केल्याने या भागातील प्रभागाची भौगोलिक रचना मोठी झाली आहे. त्यामुळे जुळे सोलापुरात सर्वात मोठे प्रभाग राहतील.

बदल कळविल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार
महापालिकेने तयार केलेला प्रारूप आराखडा आम्ही सोमवारी राज्य निवडणुक आयाोगाकडे सादर केला. निवडणूक आयोगास आवश्यक वाटेल ते बदल करून आम्हाला कळवतील. त्यानंतर त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. श्रीकांत म्याकलवार, मनपा निवडणूक विभागप्रमुख
बातम्या आणखी आहेत...