आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीत ५०० कुटुंबांना मिळेल फिल्टरचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोदी परिसरातील सुमारे ५०० कुटुंबांना आता फिल्टर केलेले शुद्ध पाणी नियमित मिळणार आहे. उन्नती फाउंडेशनने प्रभाग क्रमांक ३२ मधील जयशंकर परिसरात वॉटर एटीएम प्रकल्प सुरू केला आहे. या माध्यमातून शुद्ध पाणी मोफत पुरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी सायंकाळी सात वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांनी मिठाई वाटप केली.
उद्घाटन कार्यक्रमात पाणी घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पाच नागरिकांना एटीएम कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, आयुक्त विजयकुमार काळम पाटील, पक्षनेते संजय हेमगड्डी, कॉँग्रेस शहाराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, माजी महापौर अलका राठोड, देवेंद्र भंडारे, चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
उद््घाटन करताना महापौर आबुटे, आमदार शिंदे.

२० लिटर शुद्ध पाणी एका कार्डवर दररोज मिळेल
^आज शहरातपिवळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून एटीएम वॉटर फिल्टरचा प्रोजेक्ट सोलापुरात आणला. प्रणिती शिंदे, आमदार

असे मिळेल शुद्ध पाणी
तीस बाय तीस जागेत प्रकल्प उभारणी केली आहे. कूपनिलकेतून उपसा केलेले पाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीत साठवले जाईल. ते पाणी फिल्टर मशीनच्या टाकीत जाईल. यात बाराशे लिटर पाण्यावर प्रक्रिया होऊन ५०० लिटर शुद्ध पाणी मिळेल. उर्वरित ७०० लिटर पाणी इतर कामाकरता वापरण्यात येईल. ही मशीन एका तासात ५०० लिटर पाणी शुद्ध करते. २४ तासांत १२ हजार लिटर शुद्ध पाणी मिळेल. वीज बिल, मशीन देखभाल उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती पराग शहा यांनी दिली.