आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पोहोचण्यास 6 दिवस, उपलब्ध पुरणार 5 दिवस; 3 दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधारा येथील पाणी संपत आले आहे. टाकळी येथील जॅकवेलला साडेचार फूट पाणीसाठा आहे. तो पाच दिवस पुरेल. उजनीतून धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पंढरपूरच्या पुढे आले असून, औज बंधाऱ्यात येण्यास सहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे एक दिवस पाण्याची काटकसर करत बंधाऱ्यातील पाणी पुरवावे लागेल. 
 
उजनी धरणातून रविवारपर्यंत चार हजार ८०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत हाेते. पात्रात पडलेले वाळूचे खड्डे पाहता पाण्याचा वेग मंदावत होता. त्यामुळे सोमवारी पहाटे सहापासून सहा हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे औज बंधारा येथे सहा दिवस पाणी पोहोचण्यास लागतील. 
 
उपलब्ध होणारे पाणी आणि लागणारे पाणी पाहता दोन दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यास मनपा प्रशासनास अडचणी येत आहेत. रात्री बाराच्या पुढे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात उन्हाळा संपेपर्यंत दोन दिवसांऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नवीन पदाधिकारी निवड झाल्यानंतर त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...