आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत पूरस्थिती; जनी, वीर धरणातून पाणी साेडल्याने भीमा नदीपात्रात विसर्ग वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - उजनी धरणातून ७०  हजार, तर वीर धरणातून १४ हजार ९०० क्युसेक वेगाने भीमा नदीत विसर्ग सुरू अाहे. त्यामुळे पात्रात पाणी वाढले असून नदीकाठच्या गावांना  सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला अाहे. सध्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून महाद्वार घाटाच्या पायरीला पाणी लागले आहे.   

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले की, धरणातून नदीमध्ये असाच विसर्ग सुरू राहिला तर नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता अाहे. त्यामुळे पालिकेकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.  उजनी धरणातून आतापर्यंतच्या सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पंढरीतील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह आसपासची दोन, चार मंदिरे निम्मी पाण्याखाली गेलेली असून उर्वरित लहान मंदिरे तसेच विविध संतांच्या समाध्या पाण्याखाली गेल्या आहेत.  शहरातील नदीकाठच्या व्यासनारायण, अंबाबाई पटांगण, कैकाडी महाराज मठ परिसर आदी भागांतील नागरिकांना तसेच नदीकाठाच्या दोन्ही बाजूला झोपडपट्टीत राहत असलेल्या मंडळींनादेखील सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून या लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश पालिकेला तसेच पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती बर्गे यांनी दिली.  
आपत्ती यंत्रणा विभाग सतर्क : भीमा नदीपात्रात पाणी सोडल्याने पंढरपूर नगर परिषदेची आपत्ती यंत्रणा सज्ज झाली आहे. पात्रात एक रेस्क्यू बोट, जेसीबी, डप्पर व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वाहन व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या संपूर्ण पूरपरिस्थितीवर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पालिकेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री, कर विभागाचे प्रमुख सुनील वाळूजकर, अग्निशमन विभागप्रमुख पद्मनाथ कुल्लरवार आदी अधिकारी लक्ष ठेवून आहेत.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा ... 
बारामती-फलटण महामार्गावरील तात्पुरता  पूल वाहून गेला; वाहतुकीत अडथळा 
बातम्या आणखी आहेत...