आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी २१ कोटी हवेत, पैसे नसल्याने पालिकेपुढे पेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनी धरणातून शहरासाठी घेतलेल्या पाण्याच्या बिलापोटी थकीत आणि चालू वर्षाचे मिळून २१ कोटी रुपये महापालिकेने भरले तरच पुढील वर्षासाठी पाणी राखीव ठेवता येईल, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. पण, आर्थिक स्थिती पाहता २१ कोटी रुपयांचा भार महापालिकेस सोसवणे कठीण आहे. टप्प्याटप्प्याने भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखवली आहे.

एका वेळेस पाच कोटी
उजनीधरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहचण्यासाठी एका वेळेस दोन टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. ते पाणी सोलापूर शहर नगरपरिषदेसह इतर पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना दिले जाते. त्यांना दिलेल्या हिश्श्यापोटी आकारणी केली जाते. शहरासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठी एकावेळेस पाच कोटी सात लाख रुपये आकारणी केली जाते.

१५.४१कोटी थकबाकी
पाणी दिल्यापोटी सिंचन विभागाकडे भरण्यात येणाऱ्या रकमेपैकी १५.४१ कोटी थकीत रक्कम, आगामी काळातील पाण्याचे असे मिळून २१.१० कोटी रुपये भरण्याचे पत्र जिल्हा प्रशासनाकडून मनपास देण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने भरू
शासनाच्या सिंचनविभागाने १५ काेटी रुपये थकीत रकमेची मागणी केली आहे. मनपाकडे तितकी रक्कम तूर्त नाही. टप्प्याटप्प्याने भरू.” मुकुंदभालेराव, सार्वजिनक आरोग्य अभियंता, महापालिका

महापालिकेकडे नाही तरतूद
कच्च्या पाण्याच्या बिलाइतकी आकारणी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली. त्यासाठी त्यांनी २००४ च्या शासन अध्यादेशाची पुष्टी दिली. त्यामुळे २०१४ पासून आकारणी सुरू केली. यापूर्वी महापालिका अंदाजपत्रकात कच्च्या पाण्यासाठी दरवर्षी दोन काेटींची तरतूद केली जात होती. त्यापेक्षा जास्त तरतूद करणे आवश्यक आहे. महापालिकेची वार्षिक पाणीपट्टी सुमारे ४० कोटी गोळा होते. त्यापैकी १५ कोटी पाण्याची तरतूद करावी लागणार आहे. यामुळे महापालिकेसमोर अडचणी आल्या आहेत.

एक एमएलडीसाठी आकारणी अशी
औद्योगिक: ७६८० रु., घरगुती : ५०४ रु.
बातम्या आणखी आहेत...