आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला उद्यापासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा, औजमध्ये आज पोहोचणार उजनीचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी मंगळवारी आैज बंधारा येथे पोहोचणार अाहे. त्यानंतर टाकळी पंप हाऊस येथील तीन पंप पूर्ण क्षमतेने चालणार असून बुधवारपासून शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल. औजमध्ये पाणी आल्याने गेल्या आठ िदवसांपासून शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी दिली.

शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात आयुक्त काळम पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, उजनी धरणात सध्या वजा ४२ टक्के पाणी असून, त्यामुळे तेथे दुबार पंपिंग करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी उजनी पंप हाऊस येथून चार पंपाव्दारे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू आहे. धरणातील पातळी वजा ५२ झाल्यानंतर मात्र तिबार पंपिंग करावे लागणार आहे. औजमध्ये पाणी कमी झाल्याने शहरात मागील आठवड्यापासून सहा ते सात िदवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

आज पोहोचणार पाणी
उजनीतूनसोडलेले पाणी औज बंधारा येथे मंगळवारी पोहोचणार आहे. बंधारा साडेचार मीटर भरून घेण्यात येणार आहे.शिवाय चिंचपूर बंधाराही पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आहे. दोन्ही बंधारे भरल्यास पाच दिवसाआड पाणीपुरवठा करून येथील पाणी शहरासाठी ६० ते ७० दिवस पुरले, अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता राजकुमार रेड्डी यांनी दिली.

या भागात आहे विस्कळीत पुरवठा
शंकर नगर, साखर कारखाना, हत्तुरेवस्ती, होटगी रोड, जुळे सोलापूर, विजापूर रोड, अक्कलकोट रोड, विडी घरकुल, कसबा, वर्धमान नगर, लष्कर, कन्ना चौक, शेळगी आदी भाग.

२४ बाय पाणीपुरवठा शक्य
उजनीआणि औज बंधारा येथून पाण्याची उपलब्धता पाहता शहरात २४ बाय (२४ तास) याप्रमाणे पाणीपुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी तांत्रिक कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. पाण्याची गळती थांबवणे, अनधिकृत नळ शोध मोहीम घेणे आदी कामे करण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र कक्ष स्थापन करावे असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील, शिवानंद पाटील, सुरेखा अंजिखाने यांनी महापालिका सभेत दिला आहे.

उजनी धरणात दुबार पंपीगव्दारे पाणी उपसा सुरु आहे.
आज बैठक : शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजता पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, झोन अधिकारी, चावीवालेसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

बुधवारपासून पाच दिवसांआड
औजबंधाऱ्यात पाणी आल्यावर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल. शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या. मागेल त्यांना टँकर देण्यात येईल. विजयकुमार काळम पाटील, मनपाआयुक्त