आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याअभावी स्वच्छ भारतचे तीन-तेरा, मराठवाड्यावर उघड्यावर जाण्याची वेळ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो.... - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो....
सोलापूर- सोलापूरसह अख्या मराठवाड्यावरच उघड्यावर शैचास जाण्याची वेळ आली आहे. एकट्या सोलापूर शहरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने मंगळवारी मोहीम राबविली. यावेळी ३ हजार ११७ जण उघड्यावर जाताना आढळून आले. याबाबत चौकशी केली असता बहुतेकजणांनी पाणी नसल्याने शौचालयाचा वापर करत नसल्याचे सांगितले. दरम्यान १५५७ जणांकडून शौचालय बांधणीचे फॉर्म भरून घेण्यात आले. सोलापूर शिवाय उर्वरित मराठवाड्याचा विचार केला तर, मराठवाड्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. मात्र मराठ वाड्यावर कोसळलेल्या अशा परिस्थितीमुळे स्वच्छ भारत अभियानाचे तिने तेरा वाजले आहेत, यात शंकाच नाही....

पाणीटंचाईचा फटका स्वच्छ भारत मिशनवर बसत आहे. पाणीच नसल्याचे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

मंगळवारी महापालिकेच्या वतीने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. मनपाच्या आठ झोन मधील ९४ ठिकाणी ४१४ मनपा सेवक २१० जणांचा लोकसहभाग घेऊन पहाटे पाच ते सकाळी आठ यावेळेत तैनात होते. यात तीन हजार ११७ जण उघड्यावर शौचास बसल्याचे दिसून आले. त्यापैकी १५५७ जणांनी जागेवर शौचालयाचे फॉर्म महापालिकेकडे भरून दिले.

झोन क्रमांक तीनमध्ये सर्वाधिक
उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांची संख्या झोन क्रमांक तीन मध्ये सर्वाधिक ६४३ आढळून आली. यात पूर्वभाग, अक्कलकोट रोड, तुळजापूर रोडचा भाग येतो.
पुढास स्लाइड्सवर जाणून घ्या, नेमकी काय आहे मराठवाड्याची दयनीय परिस्थिती...