आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीसाठी आता रोज दहा ऐवजी सहा तास पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- उजनीते सोलापूर जलवाहिनीतून एमआयडीसीला दररोज दहा एमएलडी पाणी देण्याचा करार आहे. मात्र, शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेता एमआयडीसीला दररोज सहा तास पाणी देण्याचा निर्णय मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी घेतला आहे. गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

एमआयडीसीच्या दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तेव्हा आयुक्तांनी मनपाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. शहरास पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा असून, उजनीत दुबार पंपिंग करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची आवक कमी झाली आहे. असे असताना एमआयडीसीला देण्यात येणारे पाणी बंद करावे, असा आग्रह महापालिका पदाधिकाऱ्यांचा आहे. त्या ऐवजी रोज सहा तास पाणी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. उजनी जलवाहिनीवरून देण्यात येणारे जोडच्या ठिकाणी मीटर बसवणे, रोज रात्री सहा तास पाणी देण्यात येणार आहे.

आज बैठक
एमआयडीसीतीलपाणी कपातीबाबत निर्णय सांगण्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना माहिती देणार आहेत.

उद्योग टिकावेत ही इच्छा
उद्योगबंदपडावे असे महापालिकेचे मत नाही. ते टिकावेत अशी इच्छा आहे. पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे तात्पुरते पाणी कपात केली आहे. पुढील काळात पुन्हा त्यांना जादा पाणी देण्यात येईल. विजयकुमार काळम-पाटील, मनपाआयुक्त