आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यासाठी मनपा दीड कोटी भरण्यास तयार, दोन दिवसांत निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आषाढीवारीसाठी शासनाकडून उजनीतून पाणी सोडण्याची तयारी आहे. दरम्यान सोलापूर शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता आषाढीचे पाणी पुढे शहरासाठी सोडावे, अशी मागणी महापालिकेची आहे. पाणी सोडण्यासाठी जलसंधारण विभागाने पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, महापालिका दोन दिवसांत दीड कोटी भरण्यास तयार आहे. पाणी सोडण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमवेत आयुक्त काळम पाटील मंगळवारी मुंबईत होते. मंत्रालयात याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यावर दोन दिवसात निर्णय होणार आहे.
त्यानुसार महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी उच्च न्यायालयातील मनपा वकिलांशी चर्चा केली.
अमृत याेजना, स्थगिती उठवण्याचे प्रयत्न
पाणीपुरवठामंत्रीबबनराव लोणीकर यांनी अमृत योजनेची आढावा बैठक मंगळवारी मंत्रालयात घेतली. सोलापूरच्या अमृत योजना टेंडर प्रक्रियेत इलेक्ट्रिक आणि सिव्हिल (बांधकाम) या दोन्हीचे टेंडर एकत्र काढण्यात आले. दोन्ही टेंडर एकत्र काढता येत नाही. म्हणून नाशिकच्या मक्तेदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या टेंडर प्रक्रियेस स्थगिती मिळाली. ती स्थगिती लवकर उठवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...